सामान्य शेतकरी बनला राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष!
पुणे-राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी काशिनाथ शेवते यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी कर्नाटकामधील संगोळी रायन्ना यांच्या राज्याभिषेक दिनी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पदी काशीनाथ (नाना)शेवते यांची सर्वानुमते निवड केली.शेवते हे शेतकरी आहेत.एका शेतकऱ्याला पक्षाच्या राज्याचे अध्यक्षपदी निवड करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.


काशिनाथ शेवते हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांचे जुने सहकारी आहेत. त्यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.शेवते यांचे गाव फलटण तालुक्यातील जावली आहे.तर राज्याच्या महासचिव पदी ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांची निवड करण्यात आली आहे.

‘राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार प्रत्येक गावात पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवते म्हणाले..