चंद्रपूर बल्लारपूर महामार्गावर भिषण अपघातकाही काळ कार हवेत उडत असल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

“देव तारी त्याला कोण मारी”असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही. असाच एक कार अपघात झाल्यानंतर व काही क्षण ती कार हवेत उडाल्यानंतर आतमधे बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रशीद्ध देवस्थान बाबा फरीद यांच्या गिरड वरून दर्शन करून आल्यानंतर आपल्या गावाला जाताना वाटेतच कार चा समोरचा टायर फुटल्याने ड्राइवर चे गाडीवरचे नियंत्रण सुटले व ती गाडी डिवायडरवर आदळून उडाली परंतु दुसऱ्या बाजूने ती गाडी आदळली पण कुणालाही दुखापत झाली नाही.नांदगाव पोडे या गावातील एक परिवार गिरड च्या दर्ग्याचे दर्शन करून परत गावाला जाताना चंद्रपूर बल्लारपूर महामार्गावर कार चा समोरचा टायर फुटून अपघात घडला.पण कार मधे महिला व लहान मुलांना साधी दुखापत सुद्धा झाली नाही हे विशेष.