ट्रॅक्टर धडकेत ५वर्षीय बालकांचा मृत्यूसावली महामार्गावर खेळत रस्ता ओलांडताना एका ५वर्षीय बालकांला ट्रॅक्टरची धडक बसल्याने गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
आज सकाळी १०वाजता सुमारास सावली शहरातील धोटे यांच्या मालकीची ट्रॅक्टर आठवडी बाजाराकडून बस स्टॅण्ड कडे जात असताना समोर खेळत असलेला यथार्थ भाष्कर कलसार वय वर्षे ५ यांचा रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.पुढील तपास सावली पोलिस करीत आहे.