जि.प.सिईओच्या आदेशाने ताडाळी ग्राम पंचायतीत खळबळजिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या ताडाळी येथील ग्रामपंचायतने ठराव क्र. ८/१९, दिनांक १८/०३/२०२१ ला १५ वित्त आयोगातुन उसनवार दाखवुन घेवुन ग्रामपंचायत फंडातुन कोणतेही तातडीचे काम करण्याचे नसताना, तसेच १५ वित्त आयोगात शासन नियमात बंधीत / अबंधीत तसेच आराखड्यात उसनवार घेण्याबाबत कोणतीही तरतुद नसतांना सुध्दा ग्रामसेवक यांचेवर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाधिकारी यांनी दबाव आणून नियमबाह्य खर्च केलेला आहे..

सदर खर्च मार्च २०२१ या महीन्यात केलेला आहे. याची ग्रामपंचायतीच्या कोणत्याही संबंधीत खात्यात परतफेड केलेली नाही, त्यामुळे सदर ठराव नियमबाह्य व विकास कामाचा निधी अन्यत्र खर्च करणारी असल्याने ठरावास सहमत दर्शविणा-या सरपंच, सदस्य यांची सदस्यत्व रद्द करणारी आहे.

तसेच ग्रामपंचायत पदाधीका-यांनी ग्रामपंचायतची कोणतीही पुर्वपरवानगी व सबळ कारण नसतांना ग्रामपंचायत हद्दीतील मोठ-मोठे वृक्षतोड करून संबंधीत वृक्ष परस्पर विकले आणि त्याची कोणतीही रक्कम वा लिलावा द्वारे प्राप्त रक्कम ग्रामपंचायतला जमा केलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी दि.२९/०९/२०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहे. मात्र याकडे वरीष्ट अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने सरपंच व सदस्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाची अजुन पर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे त्यांची योग्य चौकशी करून सरपंच व सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केले होते. गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात होता.मात्र गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याने ग्राम पंचायत सदस्यांमध्ये खळबळ माजली आहे.चौकशीच्या आदेशामुळे सरपंच व सदस्यांवर अपात्रेची टांगती तलवार डोक्यावर आहे.