सख्या दोन लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून पेटविलेगडचांदूर:-
येथील मुक्तीधाम परिसरात दोन सख्या लहान भावांनी मोठया भावास डिझेल टाकून पेटविले.आरोपी नामे रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (38),अमृत रामजी मूनेश्वर (30) यांनी मोठा भाऊ जयदेव रामजी मूनेश्वर (46) याला कौटुंबिक वादातून डिझेल टाकून पेटविले. जखमी जयदेवला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.सदर घटना आज रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली,
आज सकाळी लहान मुलावरून आरोपी व जयदेवच्या बायकांमध्ये वाद झाला.त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी जयदेव शेतातून आल्यावर त्याच्यावर डिझेल टाकून पेटविले.आरोपींना पोलीसांनी अटक केली असून कलम 307,285,34 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे तपास करीत आहे.