गोपाणी स्पंज आयर्न कामगारांचे दिनांक 6 ऑक्टोबर पासून अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू आहे आजचा 6 वा दिवस आहे, आज दिनांक 11 ऑक्टोबर ला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीं अन्नत्याग आंदोलन सुरू असलेल्या मंडपात भेट दिली व कामगारांनाच्या तब्बेतेची विचारपूस केली कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे शब्द कामगारांना दिले आहे, त्या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी गोपाणी कंपनीने कसलीही सूचना न देता, मागील १७ वर्षापासून कार्यरत असलेल्या ५०० कामगारांना गोपाणी व्यवस्थापकानी कामावर काढून टाकले होते याबाबत जाब विचारला असता गोपानी व्यवस्थापन चर्चा करायलाही तयार नाही. परिणामी, या ५०० कामगारांना व कुटुंबाला उपासमार सहन करावी लागत आहे, म्हणून कामगारांना अन्न त्याग आंदोलन करावे लागत आहे अशी माहिती खासदारांना दिली, सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत असलेले नितीन खरतड,नरेंद्र वाकडे,प्रशांत पिंपळे,विजय मासिरकर, शामसुंदर मेश्राम , पाच कामगारांची तब्बेत अत्यन्त खालावली आहे, त्या वेळी संघटनेचे महासचिव रमेश बुच्चे, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, कार्याध्यक्ष तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर,सदाशिव चतुर , सचिन वैरागडे,व इतर कामगार उपस्थित होते.