झोन क्र.३ चे अनाधिकृत बांधकाम "आर्थिक" प्रलोबनातुनचंद्रपूर शहरातील बंगली कॅम्प मुल रोडजवळील चंद्रपूर पब्लीक शाळेच्या समोर असलेल्या शासकीय जागेवर अनाधिकृत पणे नगरसेवकांच्या संगणमताने अवैधरित्या अनाधिकृत बांधकाम सुरू आहे.महानगर पालीकेचे यासाठी कुठलेही परवानगी नसतांना सुध्दा "आर्थिक प्रलोबनातुन हे अवैध काम सुरू असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील चंद्रपूर शहर महानगर पालीका हद्दीत येणाऱ्या मुल रोडवरील चंद्रपूर पब्लिक स्कूलच्या समोर असलेल्या सर्व्हे क्र.५०३/१झोन क्र३मधील शासकीय जागेवर मागील अनेक वर्षापासून काही लोकांनी अनधिकृतरित्या कच्चे बांधकाम केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सदरहू कच्चे बांधकाम पाडून सरकारी जागेवर परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली सदर बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन होत आहे तसेच बांधकाम करून बेकायदेशीररित्या हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलल्या जात आहे.विशेष म्हणजे हे जे अवैध बांधकाम सुरू आहे ती चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्य रस्ताच्या बाजूला असलेल्या नालीवरच हे पक्के बांधकाम करण्यात येत आहे.
याविरोधात नागरीकांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना तक्रारी देऊन याबाबत ची सविस्तर माहिती सांगण्यात आले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानुसार सदरहू बांधकामाचे कुठलीही परवानगी न देता बांधकाम करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे तसेच सदर जागेच्या मालकी हक्काबाबत ची व बांधकामाच्या मजुरांची मजुरी बाबतची कागदपत्रे सात दिवसाच्या हात कार्यालयात सादर करावे अन्यथा अवैद्य बांधकाम करणाऱ्या विरोधात योग्य ती कारवाई कार्यालयीन कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व त्याची जबाबदारी आपली असेल अशा आशयाचे पत्र दिनांक २८/९/२०२१ रोजी पाठवण्यात आले आहे,मात्र तरीसुद्धा अवैध बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी कुठलीही शहानिशा न करता व नगरसेवकांना हाताशी धरून पक्के बांधकाम करीत असल्याचे बोलले जात आहे याविरोधात नागरीकांनी चांगलेच दंड धोपाटले असून आंदोलनाची परीस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.