कोरपना: प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत सन २०१८-१९ मंजूर डीपीआर मध्ये पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर या दोन्ही लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले, व बांधकाम परवानगी मिळाल्या नंतर  बांधकाम सुरू केले   घरकुलाचे बांधकाम जोता लेव्हल झाले असून
 अनेक महिने लोटले परंतु त्यांना अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात अजून पर्यंत जमा झाले नसल्याने त्यांनाआर्थिक संकटाना समोर जावे लागत असल्याने पुढील बांधकाम थांबले असून त्यांना घरकुल लाभापासून वंचित ठेवण्याचा नगर पंचायतच प्रकार सुरू असल्याने  अखेर या दोन्ही लाभार्थ्यांना आमरण उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे लागत आहे.
        कोरपना येथील अनेक लाभार्थ्यांना  सन २०१८-१९ मध्ये प्रधान मंत्री आवस योजने अंतर्गत घरकुल मंजूर होऊन अनेकांचे बांधकाम सुरू झाले व त्यांना पहिली व दुसरी किस्त त्यांच्या बँक खात्यात जमा सुद्धा झाली,परंतु किशोर कारेकर व पुंडलिक कारेकर  या  दोन्ही लाभार्थ्यांची पहिल्या टप्प्यातील किस्त देण्यास नगर प्रशासनाकडून अनेक कारणे समोर करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जात आहे. 
   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना घर नाही अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवस योजना राबविण्यात आली आहे. परंतु  एखाद्याचा विरोध म्हणून  काही राजकीय विरोधक तक्रार कर्त्याना हाताशी धरून निरर्थक  तक्रारी करून नगर पंचायत त्यांना पाठबळ देत असल्याने या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे अनुदान मिळत नसल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अखेर त्यांना आपला अधिकार मिळवून घेण्यासाठी नाईलाजास्तव आमरण उपोषणाचे हत्यार हाती घ्यावी लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
      लाभार्थ्यांनी घरकुलाचे अर्ज करतेवेळी सर्व आवश्यक दस्तऐवज दिले त्यानुसार त्याची शहानिशा करूनच त्यांना  घरकुल मंजूर झाले व  बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी सर्व अटी व शर्तीचे पालन करून बांधकाम केले  असताना आता कोणाच्या तक्रावरून त्याचे अनुदान रोखण्याचा अधिकार कोणी दिला.नगर पंचायत मध्ये या लाभार्थ्यांचा निधी जमा असतांनी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक अनुदान देण्यास नगर पंचायत टाळाटाळ करीत असल्याने सदर लाभार्थी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे, त्यामुळे दहा दिवसांच्या आत रक्कम सदर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास नगर पंचायत समोर आमरण उपोषणाला बसल्याचा इशारा किशोर कारेकर व पुडलीक कारेकर यांनी दिला असून त्या बाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

 
 
 
 
 
 
