गडचांदूरच्या विद्यमान नगरसेवकांना डावलून न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांनी म्हणे विकासकामांसाठी घेतली पालकमंत्र्याची भेट!गडचांदूर : आपल्या उतावळेपणा बद्दल प्रसिद्ध असलेले गडचांदूर न.प. चे शरद जोगी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने गडचांदूरात गमतीच्या भाग ठरत असतात. आज शनिवार दिनांक दहा जुलै रोजी गडचांदूर नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी आणि रऊफ खान यांनी माननीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची नागपूर येथे भेट घेतली. भेटीचे फोटो सोशल मीडियामध्ये व व्हॉट्सॲप ग्रुप वर टाकून गडचांदूर नगर परिषदबाबत विकास कामासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करताना असा अकलेचे तारे तोडणारा चुकीचा संदेश फिरवून गडचांदुरकरांना भ्रमीत करण्यात आले. सोशल मीडियावर फिरणारा या संदेशामुळे स्वतःचे हासे करून घेत घटक पक्षातील नगरसेवकांनी नाराजी मात्र ओढवून घेतली आहे. विद्यमान नगरसेवकांना डावलून नगर परिषदेशी काडीमात्र संबंध नसलेल्यांना घेऊन कोणती बरे विकासकामांची चर्चा उपाध्यक्ष महोदयांनी पालकमंत्र्यांनी केली असेल या चर्चेला गडचांदूरमध्ये ऊत आला आहे. वायफळ प्रसिद्धीची हाव असलेले शरद जोगी यांनी यातून घटक पक्षाच्या नगरसेवकांची नाराजी ओढवून घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे. "फोटोपेक्षा प्रेम मोठी" अशी त्यांची प्रतिभा झालेली आहे, या फोटोमुळे त्यांच्या या प्रतिभेमध्ये पुन्हा एक भर जोडण्यात आली.