दारू दुकानांच्या NOC साठी गडचांदूर न. प. ने आयोजित केली विशेष सभा !




गडचांदूर : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेल्या गडचांदूर नगरपरिषदेने मंगळवार 20 जुलै रोजी एकच विशेष समिती सभेचे आयोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर शहराच्या विकासाचा साठी गडचांदुर नगर परिषद एवढी कधीच गंभीर राहिली नाही. 20 तारखेला तडकाफडकी बोलविण्यात आलेल्या या सभेत एकंदर पाच विषय घेण्यात आली असून त्यामध्ये लांजेवार यांचे देशी दारूचे दुकान हे गडचांदूर शहरात स्थलांतरित व्हावे पाचवा मुद्दा म्हणजे गडचांदुर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या धर्मपत्नी सौ रीता शरद जोगी यांच्या आदिती वाईन बार अँड रेस्टॉरंट ला परवानगी देण्यासंदर्भात विषय घेण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शरद जोगी यांच्या नवीन दारू दुकानाचा परवान्याला ना हरकत देण्यासाठीच ही सभा बोलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नपच्या पदाधिकाऱ्याच्या फक्त वाईन बार ला सत्ताधारी पक्षाने कळीचा मुद्दा बनविला ही बाब गडचांदुर शहरामध्ये चर्चिला जात आहे. गडचांदूर च्या विकास कामावर आजपर्यंत नगरपरिषद एवढी गंभीर कधीच नव्हती फक्त दारू दुकानांच्या नूतनीकरणासाठी व एनओसी साठी गडचांदूर न.प.ची धडपड ही अत्यंत केविलवाणी म्हणावी लागेल. वार्ड क्रमांक तीन मधील प्रभाग 4 मध्ये शरद जोगी यांचे नविन आदिती वाईन बार अँड रेस्टॉरंट ला नाहरकत मिळावी यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वार्ड क्रमांक तीन मधील प्रभात चार मध्ये या नवीन बार बाबतचा एन-ए व बाकी कागदपत्रे हि अपुरे असूनही या बारचा नाहरकत तिच्या विषय या सभेत चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे 40 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात 10 वाईन बार चार देशी दारूची दुकाने सद्यस्थितीत कार्यरत आहेत. असे असतांनाही न.प. उपाध्यक्ष शरद जोगी दारू दुकानाला विशेष सभेत ना-हरकत मिळावी यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक नगरी असलेला गडचांदूर शहर बेरोजगारी व प्रदूषणाने माखलेला आहे. गडचांदूर शहराच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी एवढे प्रयत्न कधीच केले नाही तेवढे आज दारू दुकानांसाठी होत सत्ताधाऱ्यांची धडपड ही चिंतेची बाब असल्याचे विरोधी पक्षाचे मत आहे.


*स्वताचे पत्नी नामे रिता शरद जोगी यांचे नावे बिअर बार करीता व इतर ठीकानाहुन देशी दारु चा परवाना स्थालांतरन करीता नाहरकत प्रमाणपत्र करीता मा.नगराधक्ष यांनी लावली विषेश सभा*!

*माणीकगड सिमेंट कंपनीचा मोठ्या प्रमाणात डष्ट प्रदुषन होत होता तेव्हा नागरीकांनी विषेश सभा लावण्या करीता विनंती अर्ज करुनही सभा लावली नाही.परंतु दारुच्या परवाना करीता अर्ज येताच विषेश सभा लावली. यालाच म्हणावे का कर्त्यव्यदक्ष नगराधक्ष*! असा सुर विरोधकांमध्ये उमटत आहे.