▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

जगण्यासाठी ४०० किमीचा प्रवास करूनही आले हलाखीचे मरण



चंद्रपूर/ प्रतिनिधी
दम्याचा त्रास वाढल्याने कळमगाव गन्ना या छोटाश्या आडवळणातील गावापासून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी येरझारे मारले. जगण्यासाठी ४०० किमीचा प्रवास केला. तरीही नशिबी हलाखीचे मरण आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रशासकीय व आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेचा बळी ठरलाय. अशी वेळ तुम्हा आम्हावरही येऊ शकते, त्यामुळे सावधान ! कारण, प्रशासन झोपलाय... आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.
मौजा कळमगाव गन्ना (ता सिंदेवाही) येथील विकास रमेश गेडाम (वय 30 वर्षे) याला 1 तारखेला दम्याचा त्रास वाढला. सिंदेवाहीला नेऊन कोरोना टेस्ट केली. अँटीजन निगेटिव्ह आली. सिटीस्कॅन केले. आरटीपीसीआर रिपार्ट लवकर मिळाली नाही. ग्रामीण रुग्णालयाचे डाक्टरला माहिती कळवली. त्यांनी पेशंटला ऑक्सिजची गरज आहे. तुरंत हॉस्पिटला नेण्यास सांगितले व 2 मे ला अंबुलन्स मागविली. पण मिळाली नाही. शेवटी प्रायव्हेट गाडी करून सिंदेवाही येथील हस्पिटल शोधले. तिथे ऍडमिट केले नाही. नंतर ब्रम्हपुरी तिथेही बेड मिळाला नाही. गडचिरोलीला नेले तिथेही ऍडमिट करून घेतले नाही. शेवटी चंद्रपूरला आणले. खाजगी रुग्णालय मध्ये फिरले तिथेही ऍडमिट केल्या गेले नाही. अशाप्रकारे या दिवशी 250 किमी प्रवास उपचारासाठी करावा लागला. शेवटी चंद्रपूर शासकीय जिल्हा रुग्णालयात आणले. तिथे चिट्टी काढली. डाक्टर कडे ऑक्सिजनसाठी नेले. त्या ठिकाणी पेशंटला ऑक्सिजनची नितांत गरज आहे, त्याच्यावर उपचार सुरू करा, असे वारंवार हात जोडून नातेवाईकांनी विनंती केल्या . परंतु डाक्टरणी पेशंटकडे डोकावून पाहिले सुद्धा नाही व रांगेत राहण्यास सांगितले. लिस्टमध्ये नाव लिहा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला आवाज देऊ असे सांगून कोविड रूममध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन लावलेले रुग्ण होते, त्या ठिकाणी सांयकाळ पर्यंत ठेवल्या गेले. रुग्ण दम्याने खूप तळफळत होता. नातलगांच्या डोळ्यातून पाणी येत होते. दम दाटत आहे म्हणून, रुग्ण सांगत होता. डाक्टरला अक्सिजन बेड द्या, आमच्या पेशंटला बघा, अशी विनंती नातलग करीत होते. परंतु, बेड मिळाला नाही. शेवटी दवाखान्यासमोरील आंबूलन्समधून 2000रु तासांनी ऑक्सिजन मिळवला. तोदेखील २ तासाने लावण्यात आला. शेवटी रात्री रुग्णाला गावाकडे वापस घेऊन गेले. दुसऱ्या सकाळी 3 तारखेला पुन्हा उपचारासाठी नवरगाव व ब्रम्हपुरी नेण्यात आले. तेव्हाही बेड, अक्सिजन मिळाला नाही. पुन्हा चंद्रपूरला नेऊ असे ठरले व सिंदेवाहिला आरटीपीसीआर टेस्ट विचारण्यास गेले. रुग्ण जगला पाहिजे, त्याच्यावर उपचार झाला पाहिजे म्हणून सिंदेवाही ,नवरगाव, ब्रम्हपुरी गडचिरोली ,चंद्रपूर येथील अनेक हस्पिटल मध्ये जाऊन उपचारासाठी विनंती केली. डोळ्यातून आसवं गाळत जीवाचे रान केले. पैसेही मोजलेत. पण, शेवटी गाडीतच त्याने प्राण सोडला.पण , आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाली नाही. आक्सिजन, अंबुलन्स मिळाली नाही. कदाचित तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर, अक्सिजन, अंबुलन्स मिळाली असती, तर त्याचे प्राण वाचले असते. अशी वेळ तुम्हा आम्हावरही येऊ शकते, त्यामुळे सावधान ! कारण, प्रशासन झोपलाय... आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.