अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांचा हल्लाअवैध दारू विक्रेत्यांने आमच्या पोलिसांवर हल्ला केलेला आहे. त्यानंतर अटकेसाठी जात असतांना दगड फेक ही केली. आरोपींना बेडया टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बनसणार नाही. सदर प्रकरणात आमचे पूर्ण लक्ष आहे लवकरच यावर उचित कारवाई केल्या जाईल.
अनुज तारे, उपविभागीय पोलीस
अधिकारी,मूल

सावली:- तालुक्यातील किसाननगर येथे अवैध हातभट्टी ची दारू सापडल्या नंतर त्यांचा घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच अवैध दारू विक्रेत्यांकडून हल्ला करून पोलिसांना मारहाण केल्याची माहिती आहे. तालुक्यातील किसानगर हे गाव सद्या दारू बंदी पासून अवैध दारूचे केंद्र बनलेले आहे. या गावातील अध्धयाहन अधिक जण मोहफुलाची
अवैध दारू काढत असल्याचे कळते. या संदर्भात अनेकदा सावली पोलिसांनी अवैध हात भट्टी ला उध्वस्त करून त्यांची लाखो रूपयांची हानी केली तरी मात्र सद्या अवैध मोहफुल ची दारू काढण्याचा धंदा मात्र सुरूच आहे. तसेच किसाननगर वरून तालुक्यातील इतर गावात
ही अवैध विक्री साठी दारू पुरवठा केल्या जात असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. काल दिनांक 21 ला सायंकाळी 7 च्या सुमारास एका दुचाकी वाहनावर अवैध दारू असल्याची माहिती मिळाली
त्यावरून पोलिसांनी गरिबचंद नामक दारू विक्रेत्याला पकड़ले व घरात अवैध हात भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून सावली पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली मात्र त्यांचा वर कारवाई करण्यापूर्वीच पोलिसांनाच मारहाण केली. या घटनेची माहिती सावली
च्या ठाणेदार सह उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांना देण्यात आली त्यानंतर रात्रौ 10 च्या सुमारास पोलीस गाड्या किसानगर मध्ये पोहचताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात सावली पोलिसांशी संपर्क केला असता त्या
ठिकाणी असा प्रकार घडल्याचे बोलले. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.