कृष्णनगरात "स्वामी" विकतो खुले आम देशी-विदेशी दारू व बिअर !



चंद्रपूर : संपूर्ण राज्यात संचारबंदी असतांना जिल्ह्यात येणारी दारू व त्याची होणारी विक्री हा संशोधनाचा विषय आहे. रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कृष्णनगर परिसरात "स्वामी" नावाचा दारू विक्रेता खुले आम देशी-विदेशी दारू व बिअर ची विक्री करीत असतो. मागील अनेक वर्षांपासून दारूच्या व्यवसायात सक्रीय असलेल्या या स्वामींकडे पोलिसांची नेहमीचं ये-जा असल्याचे बोलल्या जाते, पैशाच्या आर्थिक व्यवहारामुळे पोलिस त्याचेवर कोणतीच कारवाई करीत नाही. रामनगर पोलिसांनी यावर त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

एकीकडे कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ,संचारबंदी अशा उपाय योजना करीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.मात्र अशा प्रादुर्भावात सुद्धा कृष्ण नगर येथील स्वामी खुलेआम देशी-विदेशी दारु व बियरची विक्री काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने करीत आहे. अनेक वर्षा पासून दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून यामुळे अनेक कुटुंब दारूच्या व्यासनाधीन झाली आहेत.तर काहीच्या संसाराची राख रांगोळ होऊन कर्ज बाजारी झाले आहेत.पोलिसात याबाबत तक्रार केली तर तेवढ्या पुरत पोलीस कारवाई केल्याचा बडेजाव करून पुन्हा मंथली वसूल करून या व्यवसायास प्रोत्साहन दिल जात आहे.त्यामुळे व्यासनाधीन कुटुंबातील सदस्य बेचैन झाले आहेत. कृष्णनगरातील स्वामी च्या रामनगर पोलिसांनी लवकर मुसक्या न आवळल्यास पुराव्यानिशी पोलिस अधिक्षकाकडे तक्रार करण्यात येणार आहे.