इंजि. पिदूरकर यांचा वादग्रस्त कारभार ?




गडचांदुर-गडचांदुर नगर परीषद कडुन शहरातील ओपन स्पेस ला संरक्षण भींतीचे तसेच सौदरीकरन काम हाती घेतले असुन.जवळपास अंदाजे 4 कोटि रुपये खर्च अपेक्षीत आहे.सदरचे काम हे आरोग्य विभागातील 14 वित्त आयोग फंडातील असल्याने विभाग प्रमुख श्री पीदुरकर यांनी प्रयत्न शर्तीला लावले व ते काम आपल्याकडे ठेवले.जेव्हा की सदरचे काम हे सिव्हिलचे आहे व हे स्वतः मेक्यानिकल ईंजिनिअर आहे.आणि यांना सिव्हिल कामाचा कुठला अनुभव नाही.तेव्हा हे काम खरोखरच दर्जाचे होतील का?या कामाची एमबी योग्य बनतील का?असा सवाल भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे केला आहे.आपल्या नगर परीषद ला सिव्हील ईंजिनीअर असताना व त्यांचे कडे फारसा कामाचा बोझा नसताना सदरचे काम मेक्यानिकल कडे सोपविण्याचा ऊद्देश का ? असा सवालही विरोधी नगरसेवकानी केला.सदरचे अंदाजपत्रक तयार करताना पिदुरकर यांनी सिव्हिल ईंजिनीअर यांना विश्वासात न घेता तयार केले.त्यामुळे त्या अंदाजपत्रकात बरेचशा चुक्या आढळल्या व त्या दुरुस्त करण्यात न प चा वेळ व पैसा खर्च झाला.आणि विकास कामाला वेळ लागत आहे. पुढेतरी काम दर्जा चे व योग्य बिल करीता सदर काम हे न.प.च्या सिव्हिल ईंजीनीअर कडे सोपविण्यात यावे म्हणुन मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन मागणी केली आहे.जर सदरचे मेक्यानीकल ईंजिनीअर कडेच ठेवले तर ''डोळ्यांच्या डाॅक्टराकडून पोटाचे ऑपरेशन
करणे होय'''.तरी याकडे मुख्याधिकारी यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


इंजि. पिदूरकर यांचा वादग्रस्त कारभार ?
गडचांदुर न.प. मध्ये सिव्हिल इंजिनिअर असलेले स्वप्निल पिदुरकर यांच्या कारभारा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. यापूर्वी चंद्रपूर क्रांतीने गडचंदुर शहरातील घनकचऱ्याच्या भ्रष्टाचारा संबंधातील वृत्ताची रखुल चौकशी केली असता त्या ठिकाणीही पिदुरकर यांची भूमिकाही संशयास्पद होती. तसे वृत्त त्यावेळी प्रकाशितही करण्यात आले होते परंतु सत्ताधाऱ्यांशी असलेली मिलीभगत व वरिष्ठ अधिकाऱ्यांची असलेले साटेलोटे यामुळे पिदुरकर गडचांदूर न.प. मध्ये आपली मनमानी करत आहे याची उच्चस्तरीय चौकशी ककरायलाचं हवी.