शहरातील घरफोडया व मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !



चंद्रपूर : मागील काही दिवसा पासुन चंद्रपुर शहरात घरफोडी व मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत मा. पोलीस अधिक्षक अरविंद सांळवे अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे यांनी चंद्रपुर जिल्हयात जास्तीत जास्त गुन्हे उपडकिस आणण्याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचेकडे जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार पो.नि. यांचे मार्गदर्शनात पोउपनि संदिप कापड़े याचे एक पथक गठीत करुन त्यांच्यावर सदर गुन्हे उघडकिस आणण्याची जबाबदारी सोपवली. सदर पथकाने आपले तपास कौशल्य वापरुन चोरी करणाऱ्या टोळीचे 4 आरोपीना ताब्यात घेतले. त्याना विश्वासात घेऊन कसोशिने विचारपुस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत 4 घरफोडया व व 3 मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले.


सदर टोळीने पो.स्टे. रामनगर येथे अपराध कमाक 48/2021, 68/2021, 111/2021, 185/2021, 113/2021, 173/2021, 188/2021 नुसार घरफोड्या व मोटार सायकल चोऱ्यांमध्ये वेगवेगळ्या कम्पनीचे बैटरी इतर मुददेगाल एकुण 3700 /रुपये रेडमी कपनी था मोबाईल किमत /-रु. 500/-रु नगदी, सोन्याची पात 5 ग्राम वजनाची किंमत 20.000/-क. असा एकुण 20/000/-रु.चा माल, सुजीकी कंपनीची काळया रंगाची भोसा इमाक MH-34 AC- 774Sf 25.000/-, जुपीटर कंपनीची मोला कमाक MH-34 al-5548 किनता 50,000/- रु, होण्डा कंपनी अंक्ट्री्हा कपनीची मोसा कमाक MH-34 2-8477 किमत 50 000/-, याप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.त्यावरूण त्याचे कडुन वरील प्रमाणे माल हस्तगत एकुण 2,35,320 /- रूपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीचे नाव 1) रोहित राजु शेट्टी वय 27 वर्ष रा. PWD क्वॉटर नं.3 बंगाली कॅम्प चंद्रपुर 2) प्रवीण रमेश सेट हांडी वय 19 वर्ष रा.इंदिरानगर,चंद्रपुर 3) मोहम्मद इमरान शवीर शेख वय 38 वर्ष रा.एकता चौक तुकुम,चंद्रपुर 4) अमन सलीम खान वय 19 वर्ष राहिंन्द चौक तुकुम,चंद्रपुर यांना अटक करूण त्याचा पिसीआर घेण्यात आला आहे.त्याचे कडून इतर गुन्हे सुदधा उघडकिस येण्याची शक्यता आहे

सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक, प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोउपनि संदिप कापडे सफी राजेद्र खनके पोहवा महेन्द्र भुजाडे, नापोशी जमिर पठाण, अलुप डांगे पोशी संदिप मुळे जावेद सिदीक्की यांनी केली.