▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गोंडपिपरी च्या 'त्या' लाचखोर शिपायांना ठाणेदार धोबे यांचेचं अभय !





चंद्रपूर : २ फेब्रुवारी २०२१ रोजी गोंडपिपरी पो.स्टे. येथील पोलिस शिपाई देवेश कटरे याला एका होमगार्ड च्या माध्यमातून लाच स्विकारतांना पकडले, यात शिपाई देवेश कटरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणेदाराला धक्का मारून पळ काढला. सध्या तो व त्याचेसोबत आणखी एक पो. शिपाई फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे यापूर्वी २३ मे २०२० रोजी साप्ता. चंद्रपूर क्रांती पोर्टल ने "गोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटो या 'त्रिदेव शिपायांचा हैरतअंग्रेज कारनामा!" या मथळ्याखाली वत्त प्रकाशित करण्यात आले होते, त्यामध्ये गोंडपिपरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले 'तिन के' नावाचे हे पोलिस शिपाई दारूवाल्यांकडून कशी वसुली करतात, यासंबंधाचे ते वृत्त होते. त्यावेळी त्या वृत्तासंदर्भात पो.नि. धोबे यांनी याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसून असे काहीही घडलेले नाही, त्या पोलिस शिपायांना बदनाम करण्यासाठीचं दारूवाल्यांनी ते कटकारस्थान रचल्याचा खुलासा त्यावेळी धोबे यांनी चंद्रपूर क्रांती चे संपादक व अन्य पत्रकारांसमोर केला होता. त्या पोलिस शिपायांना काही दिवसांसाठी दुसरे काम देण्यात आले असल्याची ही पुष्टी त्यांनी त्यावेळी जोडली होती. तसेच २३ मे च्या वृत्तासंबंधात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यावेळी धोबे यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये सांगीतले होते. गोंडपिपरी येथे या तिन ही 'के' कडून मोठी वसुली करण्यात येत असल्याच्या चर्चा त्यावेळेसपासून आत्तापावेतो होत आहेत. त्याच तिन के' मधील देवेश कटरे व संतोष काकडे हा पोलिस शिपाई लाचलुचपत प्रकरणात फरार आहे. यासंबंधात माहिती घेण्यासाठी आणि त्याच तिन के पैकी देवेश कटरे व संतोष काकडे हे होते, त्यावेळी योग्य किंवा कडक कारवाई झाली असती तर आज गोंडपिपरी पोलिस स्टेशन वर नामुष्की ची वेळ आली नसती. गोंडपिपरी पोलिस स्टेशन मध्ये यापूर्वी ठाणेदार प्रदिपसिंह परदेशी, वाहतुक शिपाई चिवंडे व आत्ता पोलिस शिपाई देवेश कटरे व संतोष काकडे असे तिन पोलिस विभागाला बदनामीच्या खाईत ढकलण्याचे प्रकार घडलेले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती काढली असती गोंडपिपरी मध्ये अवैध व्यवसायीकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केल्या जाते. या वसुलीची जबाबदारी याच तिन के वर असल्याची अधिकृत माहिती आहे. गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे यांची भुमिका मी नाही त्यातली, कडी लावा आतली' अशी आहे.