अन्यायाचा बिमोड करण्यासाठी भीम आर्मीत सामील व्हा_जितेंद्र डोहनेचंद्रपूर,मनुवाद्यांच्या मानसिक गुलामगिरीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढून समतेचे राज्य प्रस्तापित करण्यासाठी भारतीय संविधान भाग बहाल करून सर्वहारा समाजाला न्याय दिला . हळूहळू समाज परिवर्तन होत असताना या दशकात मनुवाद्याचे सरकार देऊन परत बहुजन समाजावर अन्याय अत्याचार याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आता याच अत्याचाराचे बिमोड करण्यासाठी एडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद यांच्या राष्ट्रीय सामाजिक संघटना भीम आर्मी भारत एकता मिशन मध्ये सामील होऊन एक संघ अन्यायाचा प्रतिकार करू या, असे आवाहन भीम आर्मी चंद्रपूर जिल्हा प्रमुख जितेंद्र डोहणे यांनी केले आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशन चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बल्लारपूर तालुका, व शहर कार्यकारणी गठन समारंभात बोलत होते. मंचावर जिल्हा महासचिव सुरेंद्र रायपुरे, संघप्रकाश ठमके, विशाल मेश्राम आदि उपस्थित होते, यावेळी ढोल-ताशाच्या गजरात गगनभेदी नारे देत रॅली काढून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पअर्पण करण्यात आले..
जितेंद्र डोहने पुढे बोलताना म्हणाले की , महाराष्ट्रात अनेक संघटना झाल्या मात्र त्यांची कार्य हे व्यक्तिकेंद्रित राहिले , स्वतःला मोठे करून मनुवाद्यांचे हातचे बाहुले बनले. त्यानंतर दलित पॅंथर हे लढवय्या संघटन म्हणून नावारुपास आले. मात्र कालांतराने तेही लुप्त झाले. बहुजन समाजाला तारणारा नेताच नसल्याचे दिसत असताना गेल्या पाच वर्षापासून लढवय्ये पॅंथर क्रांतिकारी योद्धा एडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद यांच्या रूपाने बहुजनांचा उगवता सूर्याचा प्रकाश भारताच्या 28 राज्यात  पडला.आणि बहुजन समाजाला नवऊर्जा प्राप्त झाली. त्या ऊर्जेचा उपयोग समाज संघटनेसाठी व अत्याचाराचा बिमोड करीत मनुवादी याचे मनसुबे हाणून पाडा, तेव्हाच आपण, आपला परिवार प्रसंगी देश सुरक्षित राहील. म्हणून  वार्ड तिथे शाखा नव्हे  तर घर तिथे भीम आर्मी ही देशाची गरज असल्याचे डोहने म्हणाले.याप्रसंगी भीम आर्मी  भारत             एकता मिशन बल्लारपूर शहर प्रमुख पदी अमर भाऊ  धोंगडे यांची तर उपप्रमुख पदी   सदानंद(bablu)करमनकर, व बल्लारपुर तालुका प्रमुख पदी अमन मारुती सोमकुवर यांची नियुक्ती करण्यात  आली. यावेळी शेकडो युवकांनी जितेंद्र डोहणे यांचे नेतृत्वात  भीम आर्मीत प्रवेश केला.  कार्यक्रमाचे संचालन सुदेश शिंगाडे यांनी केले , तर आभार अमर धोंगडे यांनी मानले .यावेळी  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.