माढेळी ग्रामपंचायत विशेष :-
माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत आता हौसे नौसे गवसे हे निवडणुकीत आपली ताकत आजमावत असून आता या निवडणुकीत जितेंद्र मूथ्था नामक अवैध सुगंधीत तंबाखू तस्कर सुद्धा एका ग्रामपंचायत निवडणुकीला उभे असलेल्या पैनेल चा फायनान्सर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माढेळी ग्रामपंचायत क्षेत्रच नव्हे तर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधीत तंबाखूची अवैध विक्री करणारे जितेंद्र मूथ्था यांनी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कमवली त्यामुळे राजकीय वरदहस्त आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी माढेळी ग्रामपंचायत निवडणुकीत एका पैनेल ला पूर्णपणे पाठिंबा देवून ते पैनेल निवडून आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत असल्याची चर्चा आहे एवढेच काय तर मतदारांना पैसे वाटप करून आपले पैनेल निवडून आणण्याची पूर्ण तयारी त्यांची झाली असल्याची गंभीर बाब आता प्रकाशात आली असून निवडणूक आयोग या गंभीर प्रकरणी त्या सुगंधीत तंबाखू तस्कर जितेंद्र मूथ्थावर कारवाई करणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे.