खासदार धानोरकर समर्थक गुंडांचा पत्रकार राजू कुकडे यांचेवर प्राणघातक हल्ला!
चंद्रपूर : रविवार दि. १८ जानेवारी २०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोग जवळ भूमिपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे हे आपल्या चारचाकी वाहनांत बसत असतांनाच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, राजु कुकडे हॉटेल राजयोगमध्ये घुसले असता आरोपी तेथेही येवन "साल्या आमचे बाळूभाऊची बदनामी करतोस काय? असे म्हणत मारहाण सुरू केली व त्यांचे हात पकडून तु आता बाळू भाऊ च्या घरी चल म्हणत खिचत होते. यावेळी त्यांचे हाताला गंभीर दुखापत झाली. व हल्लेखोर आरोपी पसार झाले. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये राजु कुकडे यांनी तक्रार दिली पण पोलिसांनी केवळ कलम ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला. यासंदर्भात मंगळवार दि. २० जानेवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर व डिजिटल मीडिया असोसिएशन च्या वतीने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री नाम. अनिल देशमुख यांना निवेदने देऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या गुंडावार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, देशाचे ग्रूहमंत्री यांच्यासह काँग्रेस कमेटी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राज्याचे काँग्रेस कमेटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलीया, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय ग्रूह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना देण्यात आल्या. या हल्ल्यामागे खासदार धानोरकर मुख्य सुत्रधार असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या हल्लेखोर गुंडावर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांकडून या घटनेचा निषेध करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, साप्ताहीक भुमीपूत्राची हाक (न्युज पोर्टल) चे संपादक राजू कुकडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दैनिक सकाळ पोर्टलच्या फेसबुक वरील झालेल्या ट्रोल संदर्भात बातमी आपल्या न्युज पोर्टलवर दि.१७ जानेवारी ला प्रकाशित केली होती. त्या बातमीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात कुठलेही वक्तव्य नसतांना व फेसबुकवर झालेल्या ट्रोलचा संदर्भ घेत ती बातमी प्रकाशित झाली असतांना खासदार बाळु धानोरकरांनी भूमिपूत्राची हाक न्यजु पोर्टलचे प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांना फोनवरून बातमी अशी का लिहिली? असा प्रश्न करून तुम्हा दोघांनाही चंद्रपूरला भेटतो म्हणून सांगीतले. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी संपादक राजु कुकडे यांना फोनवर भेटण्याची व तुम्ही कुठे आहात म्हणून माहिती घेतली होती आणि भाडोत्री गुंडाकडून १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्हा सरचिटणिस तथा भुमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला यांचा जाहिर निषेध पत्रकारांद्वारे करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षापासून अवैधधंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून या अवैधधंद्यांना राजकीय संरक्षण असल्याचे बोलल्या जाते. यातून कायदा व सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षांमध्ये जिल्ह्यात घडलेल्या हत्या, रेती-दारू तस्करीमध्ये झालेली वाढ त्यातूनच होणारे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर राजकीय व अवैध धंदेवाईक यांचेकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. थातूरमातूर कारवाई करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभाला दाबण्याचा लाजिरवाणा प्रकार जिल्ह्यामध्ये घडत आहे यावर आळा बसणे गरजेचे आहे. संपादक राजू कुकडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध पत्रकार संघटना द्वारे करण्यात येत आहे.