आरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकाला ४० हजार रूपयांच्या लाच मागणाऱ्या अशोक मते ला अटक !




चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागातून (आर.टी.ओ.) ४० हजार रूपयांची लाच मागण्याच्या आरोपाखाली प्रजासत्ताक दिनी अशोक मत्ते याचेवर आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक जेल्ल्हेवार यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक बाब चंद्रपूरात घडली. वृत्त लिहीस्तोवर रामनगर पोलिसांनी पत्रकारांनी एफआयआर च्या प्रती उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या. चंद्रपूर क्रांतीच्या प्रतिनिधीला अशोक मते याला अटक करण्यात आल्याची माहिती रामनगर पो.स्टे. चे ठाणेदार हाके यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक आमदारांच्या नावाने ही रक्कम मागितली गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पोलिसांनी त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. ज्या अशोक मत्ते यांचेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो अशोक मत्ते राजकारणामध्ये सक्रिय असून जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याच्या पैशाची तो उलाढाल करीत असल्याचे सांगीतल्या जाते. चुकीच्या पद्धतीने पैसा जमा करण्याची होड'च आज जिल्ह्यामध्ये लागलेली आहे. रेती-दारू -कोळसा सुगंधित तंबाखू हे स्वतःला पुढारी समजणाऱ्यांनी 'धन' कमाविण्याचे साधन बनविले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाचा वापर करण्याचा आणि स्वतःचे घर भरण्याचे अनैतिक कार्य आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे अशोक मत्ते प्रकरण होय !


माझे नाव उगाच अशोक मत्तेच्या नावाखाली गोवल्या जात आहे-आम. जोरगेवार

स्थानिक आमदारांच्या म्हणण्यावरून अशोक मते आरटीओ विभागात गेला या चर्चेला आज जिल्ह्यामध्ये पेव फुटले आहे. यासंदर्भात आम. किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी "अशोक मत्ते हे खासदार धानोरकर यांचे खंदे समर्थक असल्याचे सर्वश्रृत आहे.तरी सुध्दा मला गोवण्याचा प्रयन्त काही नेत्यांकडून केले जात आहे मी कोणत्याही पोलीस निरीक्षक यांना फोन केले नसतांनीसुध्दा पोलीसावर दबाव आणला असल्याचा आरोप होत आहे.पोलीसांनी माझे सर्व फोन रेकार्ड तपासावे तेव्हाच मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयन्त करावा असे स्थानिक आ.किशोर जोरगेवार यांनी "चंद्रपुुर क्रांती" या न्युज पोर्टलला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली !

पत्रकारांना 'ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या राजकारणाच्या नावाने स्वतःचे 'घर' भरण्याचे लाजिरवाणे व्यवसाय !

मागील काही दिवसांपासून चंद्रपूरात साप्ता. भुमिपूत्राची हाक चे संपादक राजु कुकडे यांनी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात बातमी (बेअकल्लांना न समजणारी, त्यांच्याचं बाजुने असलेले बृत्त) लिहील्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला. त्याची तक्रार वरिष्ठ स्तरापर्यंत करण्यात आलेली आहे. राजकारणाच्या नावाने स्वतःचे घरे भरणारे व पत्रकारांना लॅकमेलर' म्हणणाऱ्या या 'राजकारण्यांचे स्वतःचे घरे भरण्याचे लाजिरवाणे व्यवसाय समोर येत आहे. ही बाब लोकशाहीसाठी मारक आहे. जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून ज्यांना पवित्र संसदेत पाठविले तेचं आज स्वतःला 'राजे' समजत आहे. दक्षिण कोरिया च्या किम जोन उंग' समजण्याचे प्रकार जिल्ह्यात तरी घडू नये, अशी सामान्यजणांची इच्छा आहे.