राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई भोसले, महाराणी विरागंणा तुळसाबाई होळकर जयंतीनिमित्त"महिला मुक्ती दिन " व " महिला शिक्षिका दिन " साजरा



सिडको (प्रतिनिधि) :-- पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय, होळकरनगर सिडको,नांदेड येथे ज्ञानदानाच्या महिन्यात ३जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई भोसले, महाराणी विरागंणा तुळसाबाई होळकर जयंतीनिमित्त"महिला मुक्ती दिन " व " महिला शिक्षिका दिन " साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे स्वंस्थापक अध्यक्ष गोविंदराम शूरनर आणि प्रमुख पाहुणे डॉ.शंकर स्वामी वडेपुरीकर,डॉ गणपत जिरोनेकर, श्री रामराव होगले, उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात गोविंदराम शूरनर म्हणतात, राजमाता जिजाऊने शिवाजी महाराज घडविले आणि छ्त्रपती शिवाजी ने रयतेच राज्य निर्माण केले,हे रयतेचे राज्य सम्राट मल्हारराव होळकरानी , मोगलशाही व निजामशाही संपवून भारतात मराठी साम्राज्य वाढवून सम्राट बनले.या नंतर हे साम्राज्य दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांच्या ताब्यात दिले,ते मराठी साम्राज्य सम्राट यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांकडून परत मिळविले, यशवंतराव नंतर राणी तुळसाबाईने इंग्रजांशी सन १८११ ते १८१७ पंर्यत संघर्ष करून टिकविले आणि देश स्वातंत्र्यासाठी रणांगणात बलिदान दिले.फुले दापंत्यानी


१९४८ ला पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली तर या शाळेच्या पहिली शिक्षिका होण्याचा सन्मान राष्ट्रमाता सावित्रीमाई यांनी मिळविला. सावित्रीमाई ने महिलांना पंरमपरेच्या वाईटरूढीतून मुख्यतः करण्यासाठी जिवनभर संघर्ष केले म्हणून आज महिला प्रत्येक क्षेत्रात दिसत आहेत.हा आदर्श सर्व समाजानी घेतला पाहिजे व जानेवारी महिना ज्ञानदानाचा म्हणून जयंती उत्सव महिनाभर साजरा केला पाहिजे व राष्ट्रांवर प्रेम करणारा राष्ट्रिय समाज निर्माण केला पाहिजे असे प्रतिपादन प्रबोधनातून गोविंदराम शूरनर यांनी केले.
या कार्यक्रमाला सुधाकर रूद्रकंठवार, जंगले,बजरंग तेंलंग,दुर्गे,होगलेबाई,सावित्राबाई, गौरव देवकते,गौरी देवकते,प्रकाश पवार, विद्यार्थी व विद्यार्थिनी वाचकवर्ग हजर होता.
कार्यकर्त्यांचे सुत्रसंचालन सचिव मदनेश्वरनी केले तर आभार ग्रंथपाल मदनेश्वरी शूरनर यांनी मानले.