मुल नगर परिषदेच्‍या सभापती पदाच्‍या निवडणूकीत भाजपाचे वर्चस्‍वचंद्रपूर जिल्‍हयातील मुल नगर परिषदेच्‍या सभापती पदाच्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्‍व कायम राखले असून पाचही विषय समिती सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत.
दिनांक 4 जानेवारी रोजी मुल नगर परिषदेच्‍या विषय समिती सभापती पदाची निवडणूक संपन्‍न झाली. यात बांधकाम समिती सभापतीपदी प्रशांत समर्थ, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी अनिल साखरकर, शिक्षण व क्रिडा समिती सभापतीपदी मिलींद खोब्रागडे, महिला व बालकल्‍याण समिती सभापतीपदी शांता मांदाळे तसेच स्‍वच्‍छता व आरोग्‍य समिती सभापतीपदी नंदू रणदिवे यांची निवड झाली आहे.
17 सदस्‍यीय मुल नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचे 16 नगरसेवक निवडून आले आहेत. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात मुल नगर परिषदेवर भाजपाने निर्विवाद सत्‍ता मिळविली. त्‍यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या शहरात विकासाची दिर्घ मालिका तयार करत शहराचा चेहरामोहरा बदलविला. मुल शहरात आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सांस्‍कृतीक सभागृह व स्‍मारक, प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह, बस स्‍थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, इको पार्क, आठवडी बाजार, श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, पत्रकार भवनाचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम आदी विकासकामे मंजूर झाली असून यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.
मुल नगर परिषदेच्‍या नवनिर्वाचित सभापतींचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे माजी अध्‍यक्ष हरीश शर्मा, मुल नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, नगरसेवक विनोद सिडाम, सौ. रेखा येरणे, सौ. वनमाला कोडापे, सौ. विद्या बोबाटे, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगिता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलींद खोब्रागडे, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार यांनी अभिनंदन केले आहे.