महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चालवीत जाणारे एमएचसीईटी,जिईई,नीट व भर्तीपूर्व पोलीस प्रशिक्षणास मुदतवाढ देऊन 8 लाख उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योति) अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ओबीसी, व्हीजे,एन टी व एसीबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतिच्या संकेतस्थळावर जाऊन 25 डिसेंबर पर्यत प्रशिक्षणासाठी नोंदणी करावयाची आहे.सध्या कोविड 19 प्रादुर्भाव असल्यामुळे विध्यार्थ्यांना संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करण्यास अडचण जात आहे.प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात यावी व उत्पन्न मर्यादाची 8 लाखाची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे