काॅग्रेस नेत्याच्या मृत्युची चौकशी करा - भाजपाची मागणीमूल प्रतिनिधी

पंचायत समिती मूल चे माजी सभापती व सदस्य संजय मारकवार हे दिनांक 06 डिसेंबर रोजी सायंकाळी खेडी गोंडपिपरी मार्गावर डॉ.मर्लावार यांचे शेताजवळ संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत रोडवर पडून होते. त्यानंतर त्यांना कुटुंबीयानी चंद्रपूर येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर शवविच्छेदन करताना उपस्थित पोलीसांनी तपासणी केली असता मृतकाच्या डोक्याला मागे प पुढे लोखंडी राॅडने मारल्याचा जखमा दिसून आल्या. त्यामुळे सदर घटना घातपात असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला यापूर्वी मृतकाचे मोेठे बंधू राजू मारकवार यांनी केली आहे.
मृतक संजय मारकवार यांनी खेडी गोंडपिपरी मार्गाच्या चालू असलेल्या बांधकामात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. त्यासाठी कंत्राटदाराने त्यांचा राग धरला होता. त्यामुळे संजय मारकवार हे सावली वरून राजगड येथे स्वगावी परतत असतांना संबंधित कंत्राटदाराने अज्ञान इसमांच्या मदतीने त्यांची निर्घूण हत्या केली व अंगावरील दागिने व पैसेही पडविले असा आरोप त्यांच्या मोठया बंधुनी तक्रारीत केला आहे.

एका लोकप्रतिनिधीची अशी हत्या होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे परिसरात संबंधित कंत्राटदाराबाबत दहशत पसरली आहे. पण तक्रारीनंतर तीन दिवस लोटून अजूनही आरोपींना पकडले नाही. ते मोकाट आहेत. ही बाब कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करते. त्यामुळे सदर प्रकरणाची युध्द स्तरावर चैकशी करून ओरीपींना पकडले नाही. ते मोकाट आहेत.
ही बाब कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करते. त्यामुळे सदर प्रकरणाची युध्दस्तरावर चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करावी, अन्यथा जनअंदोलन छेडयात येईल अशी मागणी मूल भारतीय जनता पार्टी मूल तर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन मूलचे उपविभागिय पोलीस अधिकारी अनुज तारे यांना देण्यात आले आहे.
          यावेळी जिल्हा परीशदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरूनुले,  पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, नगरसेवक प्रषांत समर्थ, अमोल चुदरी, दिलीप पाल,मून्ना कोटगले,इश्वर कोरडे,राकेश ठाकरे,रंजित समर्थ,भारत सोपनकार,प्रशांत बोबाटे,कल्पना पोलोजवार आदी उपस्थित होते.