ओबीसी महामोर्चाचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौकात शंखनाद व तुतारी वादनाने स्वागत




विविध मागण्यांना घेऊन आज निघालेल्या ओबीसी समाजाच्या महामोर्चाचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शंख व तुतारी वादनाने स्वागत करण्यात आले. यावेळी मोर्चात सहभागी समाजबांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ओबीसी समाजाच्या वतीने आज काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला होता. या मोर्चाच्या स्वागतासाठी शहरातील गांधी चौकात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने तयारी करण्यात आली होती. मोर्चाच्या स्वागतासाठी सुरेख रांगोळीही येथे काढण्यात आली होती. मोर्चा गांधी चौकात पोहचताच शंखनाथ व तूतारी वादनाने मोर्चाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोर्चेकरुंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमूख मागणीसह इतर मागण्यांसाठी निघालेल्या या अतिभव्य मोर्चाला माझा पाठींबा असून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हि मागणीही रास्त असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.