गडचांदूर चे नवे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सुशिलकुमार नायक !




गडचांदूर (प्रति.) गडचांदूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सुशिलकुमार नायक हे लवकरच रूजु होणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीनंतर चंद्रपूर च्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यांच्या नेतृत्वात मोठ-मोठ्या दारूविक्रेत्यांवर धाडसी कारवायामुळे ते चंद्रपूरात प्रसिद्धीस आले होते, त्यानंतर त्यांची वणी येथे बदली झाली. आता त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालूक्यातील गडचांदूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे, त्यांच्या पोलिस कारकिर्दीची सुरूवात ही कोरपना येथून झाली होती, हे येथे विशेष ! आता त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून गडचांदूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली असून चंद्रपूर जिल्ह्यासोबतचं यवतमाळ च्या वणी येथील दारू विक्रेत्यांचे नेटवर्क यांचा त्यांना तगडा अनुभव आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हा विषय नायक यांच्यासाठी नविन नाही. गडचांदूर उपविभागीय कार्यालयातंर्गत गडचांदूर, कोरपना, जिवती, टेकामांडवा, पाटण, पिट्टीगड्डा व वणी असे ७ पोलिस स्टेशन तर भारी सब पोलिस स्टेशन असा मोठा व्याप या उपविभागीय कार्यालयाचा आहे. लांब पल्ल्याचे व अति दुर्गम क्षेत्र हे गडचांदूर पोलिस उपविभागीय कार्यालयातंर्गत येतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दारू व खनिज संपत्तीची तस्करी ही या भागात मोठ्या प्रमाणात होत असते. तेलंगाणा राज्याची सिमा लागून असल्यामुळे परराज्यातून दारू चा मोठ्या प्रमाणात होणारा पुरवठा व खनिज-रेती संपत्ती व दारू तस्करीतून "गब्बर" झालेल्यांना व त्यांच्या राजकीय "गाँडफादर" यांचेवर लगाम बसविण्याची जबाबदारी त्यांना "लिलया" पार पाडण्याची कसरत करावी लागणार आहे आणि याचेचं मोठे आवाहन त्यांच्यासमोर राहील, असे सांगीतल्या जात आहे. आपल्या विशीष्ट कार्यशैलीमुळे त्यांनी चंद्रपूरात आपली वेगळी छाप निर्माण केली होती व धाडसी कारवायामुळे त्यांचा शहरात दबदबा निर्माण झाला होता. अती दुर्गम भागातील राजकीय वरदहस्त प्राप्त झालेले व पैशाने गब्बर झालेल्या या तस्करांवर "नकेल" कसण्यात सुशिलकुमार नायक कितपत यशस्वी होतात, हे येणारा काळ नक्कीचं सांगेल. जिल्ह्यासोबतचं उपविभागीय कार्यालय असलेल्या मुख्य गडचांदूर शहरात दारू तस्करीमध्ये काही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी (?) पुढाकार घेतला आहे. यात गडचांदूर ही सुटले नाही. त्यावर नियंत्रण आणण्यात गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती हे पुर्णतः अपयशी ठरले आहेत. 


दारू तस्करांची साखळी गडचांदूर पोलिस स्टेशनच्या नाकावर निंबू पिळून आज त्याठिकाणी कार्यरत आहे. वणीवरून व तेलंगाणा राज्यातून गडचांदूर या मुख्यालयात मोठ्या प्रमाणावर होणारा दारू चा पुरवठा, त्यात सक्रिय असणारे तस्कर, त्यांचे असलेले-नसलेले राजकीय वलय असा "लयी मोठ्या" पसाऱ्यावर नियंत्रणाची जबाबदारी खांद्यावर घेवून त्यांना 'धाडसी' कारवायातून आपली वेगळी ओळख बनविण्याची ही नामी संधी आहे, त्यांचा जिल्ह्यातील प्रारंभाचा दारूबंदीच्या काळातील अनुभव व नंतर दारूचा पूरवठा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील तस्करांचा "दारू तस्करी" चा अड्डा समजल्या जाणाऱ्या वणी येथील "अनुभव" दारू तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी "नायक" यांना "मार्ग सुकर" करणारा राहील यात संशय नाही, येणाऱ्या काळात "गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी" कार्यालय जिल्ह्यातील "मॉडेल" म्हणून समोर येईल, हीच यानिमीत्त "नायक" यांना यानिमित्ताने शुभेच्छा !गडचांदूर चे नवे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सुशिलकुमार नायक !