पब्जी गेमिंग च्या नावावर लुबाडणुकीची होणार चौकशी !




चंद्रपूर (विशेष ब्युरो):-
काही दिवसांपूर्वी पब्जी गेमींगच्या नावाने वृत्त प्रकाशित केले होते यासोबतचं वृत्तपत्र व अन्य न्युज पोर्टल नी सुद्धा यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. नवनियुक्त पोलिस अधिक्षकांनी यासंबंधातील तक्रारीची दखल घेतली असून गडचांदूरमध्ये सक्रीय असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचे संकेत मिळाले आहे. विदर्भ राज्य ग्रामीण-शहरी पत्रकार संघाने यासंदर्भात पोलीस विभागाकडे तक्रारी केल्या असून सदर तक्रारीची जिल्हा पोलिसांनी दखल घेतली असल्याची माहिती आहे.

pubg gaming चे नावावर तरूण युवक-युवतींची ऑनलाईन लुटमार करणारे रॅकेट गडचांदूर मध्ये सक्रिय असून संपूर्ण महाराष्ट्राच्या नेटवर्क शी हे रॅकेट जुळले असल्याचे बोलले जाते. या रॅकेट च्या माध्यमातून तरूण शाळकरी युवक-युवतींची गोवून त्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक चा हा प्रकार घडत आहे. पबजी ऑनलाईन गेमींगच्या नावाने भरविल्या जाणाऱ्या या खेळात प्रारंभी अत्यंत अल्प फी आकारून शहरातील व शहराच्या बाहेरील परिचित शाळकरी युवक-युवतींना व्हॉटस् अँप ग्रुप बनवून त्यामध्ये अॅड केले जाते, ही फी भरण्यासाठी गुगल पे, फोन पे सारख्या अॅप चा वापर करण्यात येतो. Online पद्धतीने या खेळामध्ये पैशाची उलाढाल होत असल्याची विश्वसनिय माहिती आहे. गेम खेळणाऱ्यांना मोठ्या बक्षिसाचे लालच देऊन यामध्ये गुरफडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे प्रथमदर्शनी नजरेस येत आहे. पहिल्यांदा २० - ५० रूपये प्रवेश फि आकारून ज्यादा बक्षिसाचे आमिष दाखवून नंतर हजारो रूपये फि आकारल्या जात असल्याचे वृत्त हाती आले आहे. गडचांदूरात अंतर्यामी गेमिंग प्रेझेंट, Battleground tournament, Raw gaming, Thunder escorts, Gadchandur antaryami असे वेगवेगळ्या नावाचे ग्रुप या tournament भरविण्यासाठी सक्रीय आहेत.


ऑनलाइन झालेल्या सट्टयाचाच हा प्रकार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आई-वडीलांनी मुलांच्या अभ्यासासाठी त्यांना स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला आहे. विद्यार्थी या मोबाईलच्या अशा पद्धतीने चुकीच्या वापर करत असेल तर त्यावर त्वरित अंकुश लागणे गरजेचे आहे. ऑनलाइन गेमिंग च्या नावाने मुलांना चुकीची लत लावून त्यांची की अशाप्रकारे लुबाडणूक होत असेल तर ही बाब भविष्यासाठी घातक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच गुगल पे, फोन पे वर असलेले खाते (अकाउंट) याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी विदर्भ राज्य शहरी-ग्रामीण संघातर्फे पोलीस अधीक्षकांना करण्यात आली होती त्यावर आता कारवाई सुरू झाली असून लवकरच यातील म्होरके पोलिसांच्या तावडीत असतील यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन गेमिंग मध्ये काही असामाजिक तत्वे ही सामील असल्याची विश्र्वसनिय माहिती आहे.