रुग्णालयात रूग्णांची भरमार, शौचालयात ही कोंबले रूग्ण !गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची भरमार आहे. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात शौचालयात बेड लावुन रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
कोरपना, जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयातील विविध समस्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हुजूर तट्टू धोरणामुळे या रुग्णालयात येणाऱ्यांची मोठी हेळसांड होते. गरीब रुग्णांकडून होणारी लूट हा चिंतेचा विषय आहे. नुकताच घडलेला प्रकार हा संतापजनक असून यावर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा ग्रामीण रुग्णालयाच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची भुमिका समाजसेवकांनी घेतली आहे

गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी स्विपर ने घेतले 2500 रूपये : लज्जास्पद प्रकार !  • न.प. प्रशासनासोबत आरोग्य विभागाचे ही वाभाडे काढणारा प्रकार !

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. मागील काही दिवसांपासून गडचांदूर नगर प्रशासन आपल्या भ्रष्टाचारामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात एका मृतकाच्या नातेवाईकांकडून पोस्टमार्टम करण्यासाठी अडीच हजार रुपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अत्यंत लज्जास्पद असलेला प्रकार असून यावर विविध प्रतिक्रिया गडचांदूर शहरांमध्ये उमटत आहे.

स्विपरवर कडक कारवाई करणार - डॉ. गेडाम
महत्त्वाचे म्हणजे डॉ. गेडाम हे सद्यस्थितीत गडचांदूर येथे नसून ते नागपूर येथे काही कामानिमित्त गेलेले आहेत असेही यावेळी सांगण्यात आले. भ्रमणध्वनीवरून डॉ. गेडाम यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता सदर प्रकाराची आपल्याला डॉ. हिरादेवी यांनी कल्पना दिली असून असले प्रकार चुकीचे आहे. कोणतेही पैसे देण्याची कुणालाही आवश्यकता नाही. त्या स्वीपर वर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सदर प्रतिनिधींना दिली.

सविस्तर वृत्त असे की, गडचांदुर पासून हिरे बोरगाव या ठिकाणचे श्रीकांत शामराव बोबडे यांचा काल दिनांक 10 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. मृतांचे शव गडचांदूर च्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी हलविण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांकडून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील स्वीपर सुमित लोखंडे यांनी अडीच हजार रुपये उकळण्याचा लज्जास्पद प्रकार याठिकाणी घडला. गडचांदुर येथून काही समाजसेवकांनी यावर आक्षेप घेतला. परंतु आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या या प्रकरणात ग्रामीण रूग्णालयाच्या स्विपर ने मात्र रूग्णाच्या नातेवाईकांकडून ती रक्कम हडपली. यामुळे असंतोष पसरला यासंदर्भात यावेळी रुग्णालयात हजर असलेले डॉ. महेश हिरादेवे यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली असता त्यांनी असला प्रकार घडल्याची कल्पना नसल्याचे सांगितले. यासंदर्भात डॉक्टर गेडाम यांच्याशी चर्चा करण्याच्या सल्लाही संबंधित पत्रकाराला दिला. याबाबत स्लीपर सुमित लोखंडे याला विचारपूस केली असता चुकी झाली अशी चुकी दुसऱ्यांदा होणार नाही, असे सदर प्रतिनिधीशी बोलतांना आपली चुकी कबुल केली. या संदर्भात काही समाजसेवकांची बातचीत केली असता गडचांदूर ग्रामीण रूग्णालयातील हा रोजचाच प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

.