पुरामुळे झालेल्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी - देवराव भोंगळे भाजपा अध्यक्ष चंद्रपूरगोसेखुर्द धरणातुन पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर टोक हे गाव संपुर्ण पाण्याने वेढले असून संपुर्ण गावकऱ्यानी 31 आगष्टची रात्र जागुन काढली.

या गंभीर घटनेची माहीती मिळताच मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या भागाचे जि.प.सदस्य तथा भाजपा चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकारी मोहदयास फोन करुन पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोटार बोटीची व्यवस्था केली. 1 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपासुन गंगापुर टोक येथील लोकांना लाईफ बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. आहे.सांयकाळी 4 वाजेपर्यंत अदांजे 150 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या लोकांची राहण्याची व्यवस्था कवठी ( चेक ठाणे वासना) येथील जि.प.शाळेत करण्यात आली आहे. देवराव भोंगळे स्वतः मोटार बोटीने गंगापुर टोक येथे जाऊन तेथील लोकांना धीर दिला.सोबत प.स.सभापती अल्का आत्राम , भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपसभापती ज्योती बुरांडे ,प.स.सदस्य विनोद देशमुख ,गंगाधर मडावी हे होते. 30 सप्टेंबर पासुनच पुराचे पाणी वाढतच होते.त्यामुळे संपुर्ण परिस्थितीवर भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार , तहसिलदार निलेश खटके ,नायब तहसिलदार जोगदंड ,ठाणेदार नाईकवाड , सरपंच सुनंदा पिपंळशेन्डे ,बाळू पिंपळशेंडे, डॉ. पावडे ,पोलीस पाटील अल्का मडावी हे संपुर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.गेल्या 20 वर्षापासून असा पुर आला आलेला नाही असे जाणकार सांगत आहेत.

त्यानंतर देवाडा बुजरूक आणि घाटकुळ येथे जाऊन पुरपरीस्थीतीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुरामुळे शेतकऱ्यांचे धान ,कापुस ,सोयाबीन आणि भाजीपाला प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.नुकसानग्रस्त शेतीचे राज्य शासनाने तात्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत,अन्न धान्य ,निवारा ,रोजगार ,आणि खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा या क्षेत्राचे जि.प.सदस्य देवराव भोंगळे यांनी केली आहे.