एका फालतू वेबसिरिज ची निर्मिती करीत असताना ज्या मातेने २८ वर्ष राज्यकारभार केला.अटक पासून कटक पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोकउपयोगी कार्य केले त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर करून अवमान केला त्याबद्दल सरकार व स्वतःला हिंदू, मराठी, तसेच पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते किंवा कैवारी व ठेकेदार म्हणून घेणारे अनेक व्यक्ति ,संस्था, संघटना आहेत. तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे अनेक, वृत्तपत्र, चॅनल्स आहेत. सामाजिक, राजकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कुणाच्याही अस्तित्वाला, विचारला थोड जरी डिवचलं किंवा धक्का लागण्याचा प्रयत्न झाला तरी सर्वजण बोंबा मारतात. समाजासमाजांध्ये तेढ निर्माण करतात. जातीय दंगली घडवितात, अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतात.
पण आज जवळपास चार दिवस झाले राजमातेचा अवमान करणार्या एकता कपूर कपूर व तीच्या Alt बालाजी या कंपनी बदल मूग गिळून गप्प का? तोंडातून एक चक्कार शब्द बाहेर पडत नाही.म्हणजे ढोंग्याच्या तोंडाला लकवा भरलाय ?
मनोरंजनाच्या नावाखाली ZEE5 या यू ट्यूब चॅनलवरून Vargin Bhaskar नावाच्या वेब सिरीयल मधून दाखवीत असलेल्या LOVE, SEX आणि LAFDE संदर्भातील VDO मध्ये अहिल्याबाई महिला छात्रावासच्या नावाचा वापर करून पैसा कमविण्याचा प्रयत्न एकता कपूर व त्यांच्या ALT Balaji या कंपनीने केला आहे. त्यामुळे ZEE5 आणि ALT Balaji या निर्मात्या कंपनीच्या व एकता कपूर यांच्य विरोधात राज्यांतील नव्हे देशभरातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
पण हिंदू, मराठी, समाज, पुरोगामीचे कैवारी तथा ठेकेदारांचे संघ,संघटना, पक्ष व त्यांचे वृत्तपत्र, वाहिन्या हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. इतर वेळेस हेच ठेकेदार छोट्या छोट्या गोष्टीवरून राज्यात देशात सरकारला धारेवर धरतात. तोडफोड, जाळपोळ आंदोलने, मोर्चे काढताना आपण सर्वांनी पहिले आहे. पण आज एक ही मीडियावाला बोलताना किंवा याबाबतची बातमी दाखवताना दिसत नाही. एकाही संघटनेने मोर्चा किंवा आंदोलन पुकारलेले दिसत नाही. कोरोंना सारखी महामारी असताना मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने मोर्चे काढले पण हेच मंदिरे उभी करण्यासाठी देशात सर्वात जास्त योगदान ज्यांनी दिल त्या अहिल्यादेवींच्या नावाची बदनामी करताना मुग गिळून गप्प का?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय महापुरुष नाहीत का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे देशासाठी योगदान नाही का? ज्या अहिल्यादेवींच्या खजिन्या मुळे देशातील प्रमुख मंदिरे, तीर्थक्षेत्रे उभा राहिली त्या मंदिराचे ठेकेदार कुठे आहेत? ज्या अहिल्यादेवींमुळे समतेच्या विचारला बळ मिळाले ते समतेच्या, पुरोगामी विचारांचे ठेकेदार कोणत्या बिळात जाऊन बसलेत. दिवसभर छोट्या छोट्या गोष्टीं.च्या ब्रेकिंग न्यूज करणारे मीडियावाले आज गप्प का आहेत? कदाचित एकता कपूरची दलाली खाऊन तर गप्प बसले नाहीत ना? असा प्रश्न अहिल्याभक्तापुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांनी सेन्सर बोर्डाकडे तक्रार दाखल केली.तर राज्यात अनेक पोलीस स्टेशन मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली आहेत पण अजून पर्यन्त प्रशासन व सरकारने याची दखल घेतलेली दिसत नाही. कोठेही गुन्हा दाखल झालेला दिसला नाही. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची बदनामी होत असताना हे सरकार गप्प का आहे?
कदाचित या प्रकरणावरून राज्यात कायदा सुव्यस्थापणाचा प्रश्न निर्माण झाला तर याला कोण जबाबदार? एकता कपूर आणि तिची कंपनी की गप्प बसून हा तमाशा पाहणार सरकार..!!
राहिला प्रश्न एकता कपूर व तिच्या कंपनीचा व त्या वेब सिरिजला मान्यता देणार्या यंत्रणेचा अर्थात सेंसार बोर्डाने ती वेबसिरिज तात्काळ बंद करून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा या ढोंगी पुरोगामित्वाच्या कैवार्यांना व एकता कपूर हीला येणारा काळात त्यांची जागा दाखवून दिली जाईल.