वरिष्ठ वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करा- शिक्षक परिषदेची मागणी



दिनांक 27 आगस्ट गुरूवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक चंद्रपुर शिष्टमंडळाने मा.दीपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या कडे लक्ष वेधले.मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेली सहायक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करावी.पदविधर शिक्षक ,मुख्यध्यापक,केंद्रप्रमुख वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करावी.
आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा.प्रलंबित मेडिकल बील तात्काळ मंजूर करावी.नागभीड पंचायत समिती मधील काही शिक्षकाना नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता थकबाकी तात्काळ देण्यात यावी.वरोरा पंचायत समिती प्राथमिक शिक्षकाना 10 E फॉर्म खुलासाबाबत.प्राथमिक शिक्षकाना गोपनीय अहवाल प्रत देण्यात यावी.कोरपणा पंचायत समिती मधील प्राथमिक शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक अद्यवत करावे. पंचायत समिती स्तरावर संघटनेची सहविचार सभा आयोजित करण्यात यावी.
हिंदी मराठी सूट आदेश ,शैक्षणिक परवानगी आदेश देण्यात यावे.या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.चर्चेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक चंद्रपुर
विलास बोबडे जिल्हा अध्यक्ष,अमोल देठे जिल्हा कार्यवाह ,नरेंद्र चौखे कोषाध्यक्ष,सुंदर धांडे सहसंघटनमंत्री,अजय बेदरे कार्या.चिटणीस,किरण लांडे राजुरा कार्यवाह,साईबाबा इंदुरवार,आनंदराव वेलादी,खुशाल कोडापे उपस्थित होते.