उदय संस्थेच्या पुढाकाराने विद्यानगर कुर्झा ब्रम्हपुरी येथे तान्हापोळानिमित्त अभिनव उपक्रमबाल्यावस्था म्हणजे स्वच्छंद मन , निरागस आयुष्य , मौजमस्तीची लालसा , सणासुदीच्या दिवसांची आतुरतेने प्रतिक्षा पण निसर्गाला काय मान्य कुणास ठाऊक ? थोरमोठ्यांचा आनंद हिरावून घेणारी कोविड - १९ ही जागतिक महामारी लहानग्यांना देखिल नकोशी वाटत आहे. तान्हा पोळा हा बालगोपालांचा आवडता सण पण प्रशासकीय निर्देशानुसार त्यावर देखिल विरजण पडले. अशात वार्डातील प्रत्येक चिमुकल्यांच्या मुखावर हास्य उमटविण्याच्या हेतूने विद्यानगर कुर्झा ब्रम्हपुरी येथील नागरीक , तरूण मंडळ व सुशिक्षित मराठी शाळा शिक्षक मंडळी व उदय संस्था कुर्झा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभुमीवर बालगोपालांच्या गृहभेटी घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
तान्हा पोळा उत्सवनिमित्ताने याप्रसंगी सर्व चिमुकल्यांना घरपोच खाऊ , शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तद्वतच राष्ट्रीय भावनेतून प्रत्येक नागरिकांना गृहभेटीद्वारे स्वदेशी वापराबाबत प्रोत्साहन व जागरण करण्याहेतूने स्वदेशी पत्रकांचे वितरण व जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे पर्यावरण संतुलन हेतूने गतवर्षी वार्डातील केलेल्या वृक्षारोपणाचे संवर्धन व नविन वृक्षारोपणाचा संकल्प करून कार्यवाहीबाबत नियोजन करण्यात आले.
   या संपूर्ण अभिनव उपक्रमासाठी विद्यानगर कुर्झा वार्डातील रहिवासी देवेंद्र इनकने , अशोक भुरे, अमोल ठाकरे , अतुल कुर्झेकर , परमानंद बनपुरकर , संजय बावनकुळे , अरविंद अलोने , विनोद कुमरे , बादल कोडापे , शिक्षकगण ठाकरे सर , वकेकर सर , नरेश ठक्कर सर , दिपक उईके सर , टिकले सर उदय संस्थेचे अध्यक्ष सुभाष माहोरे , सदस्य विनोद दिवटे व समाजप्रेमी मंडळींनी मोलाचे सहकार्य केले. सदर उपक्रमाबाबत कुर्झा ब्रम्हपुरी मधील सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.