अकोल्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह लोकार्पण सोहळा !




आज मंगळवार दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अकोला जिल्ह्यातील पुनोती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचा व्हर्च्युअल लोकार्पण सोहळा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संपन्न होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बच्चू कडू कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे कार्यक्रमाचे उदघाटक असतील. केन्द्रीय मंत्री आदरणीय संजयजी धोत्रे प्रमुख पाहुणे असतील.
राज्यात जागोजागी 61 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बनविण्याचे कार्य जवळपास पूर्णत्वास आले आहे. महाराष्ट्रात भाजप ची सत्ता असताना हे काम झाले. तसेच धनगर जमातीसाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्याचा GR काढले आहे. या निधीचा वापर धनगर जमाती ला ST प्रमाणे सवलती देण्यासाठी - म्हणजेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, घरकुल योजना, शेतक-यांना ST प्रमाणे योजना लागू करण्यासाठी करण्यात येईल.
आपण नेहमी ' "काय चांगले केले" ' यापेक्षा 'काय केले नाही ' यावरच भर देतो. मला वाटतं या दोन चांगल्या गोष्टींसाठी आपण आनंद व्यक्त करायला हरकत नसावी, असे याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकी अंदाजे एक कोटी किंमत असलेले सभागृह, सभागृहाच्या बांधकामा व्यतिरिक्त प्रत्येक सभागृहासाठी जवळपास 10 हजार चौरस फूट (म्हणजे एकूण अंदाजे साडे सहा लाख चौरस फूट ) जागाही धनगर जमाती ला मिळाले आहे हे विसरता कामा नये.
अहिल्या मातेची पावन स्मृती राज्यात तब्बल 61 ठिकाणी चिरकाल उभारल्या. आपल्यापैकी प्रत्येकासाठी केवळ अभिमानाची व आनंदाचीच बाब नव्हे तर एक स्वप्नपूर्ति देखील आहे. यावेळी प्रत्यक्ष तेथे आपण जाऊ शकत नसलो तरी व्हर्च्युअली आपण सगळे एकत्र येऊ शकतो. आपण सर्व त्यादिवशी फेसबुक लाईव्ह वर कनेक्ट व्हावे अशी आग्रहाची विनंती आहे.
या सर्व प्रसंगी धनगर समाज संघर्ष समिति महाराष्ट्र राज्य सोबतच समाजातील इतरांची आणि अन्य समाजातील अनेकांची सतत मिळालेली साथ महत्त्वाची आहे.
याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री संजयजी कुटे यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता ही व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात केवळ एकच स्मारक नव्हे तर जागोजागी अहिल्या मातेची स्मृति चिरकाल राहील ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे डॉ विकास महात्मे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.