▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

नवयुवक बाल गणेश मंडळ व धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजनदि:29/08/2020 रोजी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रहितासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवयुवक बाल गणेश मंडळ व धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरज दरेकर, धनगर समाजाचे युवा नेते निखिल बुरांडे, धनगर समाज संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष श्री संदीपजी शेरकी व तालुका अध्यक्ष श्री प्रवीणजी बुच्चे सर यांच्या कल्पनेतून आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ सविता टेकाम नगराध्यक्षा गडचांदूर उद्घाटक उपाध्यक्ष श्री शरदजी जोगी प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा श्री गोपाल भारती साहेब, सौ अश्विनीताई कांबळे नगरसेवक गडचांदूर, डॉ अतुल मंदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बंडु बुच्चे, डॉ संजय गावित जिल्हा रक्तक्रमण प्रमुख, रामटेके मॅडम व त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सदर कार्यक्रमाचे संचालन हर्षद शेरकी व आभार महेंद्र मंदे यांनी मानले. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता तुळशीराम गाडगे, श्रीकांत चिव्हाणे, महेश काथवटे, अक्षय शेरकी, धिरज मंदे, सागर गाडगे, शितल उघाडे, आकाश ताजणे, रोशन काकडे, केतन शेरकी तसेच नवयुवक बाल गणेश मंडळाचे व धनगर समाज संघर्ष समिती चे सर्व सहकारी उपस्थित राहून परिश्रम घेतले.