उर्जानगर येथे पाच वर्षीय चिमुकलीला केले बिबट्याने ठार.


काल सायंकाळी बिबट्याने चिमुकलीला तिच्या आई समोरून उचलून झुडपात नेले व ठार केल्याने सर्वत्र शोककळा!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. ही
थरारक घटना उर्जानगर वस्तीला लागुन असलेल्या पर्यावरण चौकाजवळ घडली, लावंण्या उमाशंकर धांडेकर पाच वर्षाची चिमुकली आपल्या आई सोबत फिरायला निघाली असता रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात लपुन बसलेल्या बिबट्याने अचानक लावंण्यावर हल्ला केला व तिला उचलुन झुडपात नेले, यात लावण्या जखमी झाली.तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले .वीज केंद्र वसाहतीत बिबट आल्याने दहशत व भीतीचे वातावरण आहे.

आई समोर पाच वर्षीय चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना ही उर्जानगर वसाहतीतील रहिवाशी यांच्यासाठी चिंताजनक असून वन विभागाने या बिबट्याला त्वरित पकडून उर्जानगर वसाहतीतील कर्मचारी अधिकारी यांच्या कुटुंबियांचे सरक्षण करावे अशी मागणी होत आहे.