कोंडेखल ग्रा.पं.चे गावातील समस्या कडे दुर्लक्ष

सावली -  गावपातळीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाअंतर्गत आरोग्य समितीची नेमणूक करण्यात येत असून या समितीच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे हा या समितीचा मूळ हेतू आहे. मात्र कोंडेखल येथील ग्रामपंचायत प्रशासन ग्रामवासीयांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

भर पावसाला सुरुवात होऊन पावसाळा अर्धा संपत असताना  सुद्धा सावली तालुक्यातील कोंडेखल येथे नालेसफाईच्या कामासाठी ग्रामपंचत प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे कोंडेखल ग्रामवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे गावपातळीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राज्य सरकार प्रत्येक गावात अभियान राबवत असून त्यामाध्यमातून गाव स्वच्छ ,सुंदर आणि निरोगी कसे राहावे यावर भर दिल्या जात आहे. परंतु राज्य सरकारच्या या उपक्रमाला कोंडेखल ग्रामपंचायत  एकप्रकारे पायदळी तुडवून मनमानी कारभार करीत असल्याचे समजते. 

कोंडेखल येथील नालीसफाई च्या कामाला पावसाळा लागून सुद्धा सुरुवात झाली असुन अर्धा पावसाळा संपत येत असताना संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे घाणीवर मोठे होणारे डेंगू,मलेरिया,
हिवताप,चिकण गुणिया यासारख्या जीवघेण्या आजारासारखे  साथीचे रोग तसेच अनेक दुर्धर आजार  होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोंडेखल ग्रामवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून सुस्त कुंभकर्णाची भूमिका बजावत असल्याचे आरोप ग्रामवासीयांकडून होत आहे.
याची गंभीरतेने ग्रामवासीयांच्या आरोग्याची दखल घेत लवकरात लवकर नालीसफाईचे कामाला सुरुवात करून व रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावे.

अन्यथा वॉर्डातील नागरिकांनी ग्रा.पं.ला ताला ठोकण्याचा रोकठोक इशारा देण्यात आला आहे .