(कोरोना विशेष वार्ता) : जिल्ह्यात परराज्यातून-पर जिल्ह्यातून दारूची तस्करी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील काही पोलिस स्टेशनमध्ये संचारबंदी दरम्यान अशा प्रकारचे गुन्हे ही दाखल झाले आहेत. दारू तस्करीमध्ये लिप्त असणाऱ्या दारू तस्करांना ही institutional कोरोनटाईन करण्यात यायला हवे, चंद्रपुर चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी या बाबींकडे त्वरित गंभिरतेने लक्ष द्यायला हवे.
महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात वृत्त लिहीत्सोवर कोरोना positive रूग्णांची संख्या 22 आहे. चंद्रपुरात बाहेरून आलेले हे रुग्ण आहेत. यांच्या संपर्कात आले ते बहुतेक पॉझिटिव्ह निघाले. प्रशासनासाठी ही डोकेदुखी ठरत आहे.
संपूर्ण भारतामध्ये दारू विक्री सुरू करण्यात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेलंगाना या प्रांतातून दारूचा साठा जिवती, कुंभेझरी, गडचांदूर, राजुरा, गोंडपिपरी या मार्गाने होत आहेत. तश्या प्रकारचे गुन्हे ही विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. "जे सापडले ते चोर, जे निसटले, ते शिरजोर" अशी स्थिती आज जिल्ह्यात आहे. तेलंगाना प्रांतातून येणारा दारुसाठा जिल्ह्यातील पोलिसांनी शिताफीने पकडला आहे, आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे ही दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपींना जमानत देण्यात आली आहे. परप्रांतातून आलेला हा दारूसाठा व त्यांना आणणारे दारू तस्कर हे जिल्ह्यात परराज्यातून, परजिल्ह्यातून बाधित होऊन कां बरे आले नसतील, याचा विचार करून त्यांना फक्त कोरोनटाईनचं नाही तर institutional कोरोनटाईन करण्यात यायला हवे होते, परंतु तसे झाले नाही, त्वरीत या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दारू तस्करीतील सहभागी तस्करांवर सद्य परिस्थिती बघता वैद्यकीय दृष्टीने कडक कारवाई करण्यात यायला हवी. त्यांना institutional कोरोनटाईन करण्याविषयी पावले उचलण्यात यावीत.
परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्यांना होम कोरोनटाईन, institutional कोरोनटाईन करण्यात आले होते, प्रशासनाच्या या तत्परतेमुळे मोठा धोका अद्याप पावेतो टळलेला आहे, हे प्रशासनाचे व शासनाचे प्रशंसनीय व अभिनंदनीय असे पाऊल आहे असेच म्हणावे लागेल. परंतु परराज्यातून-परजिल्ह्यातून दारू तस्करी करणाऱ्यांकडे प्रशासनाने कडक पावले उचलायला हवी.
गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये तर संचारबंदीच्या काळामध्ये व जिल्हा ग्रीन झोनमध्ये असतांना यवतमाळ जिल्ह्यातून येणारा हायप्रोफाइल विदेशी दारू चा साठा पकडण्यात आला होता. फरार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना जमानत मंजूर करण्यात आली होती. हीच स्थिती दारू तस्करी संदर्भात सार्याच ठिकाणांची आहे. मग पर जिल्ह्यातून, परराज्यातून दारू चा पुरवठा-तस्करी करणाऱ्यांना कोरोनटाईन कां बरे करण्यात येऊ नये? या विषयाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी अवश्य लक्ष घालावे. महत्त्वाचे म्हणजे परजिल्ह्यातील परराज्यातून परवानगी घेऊन आलेल्यांना कोरोनटाईन करण्यात आले होते, तरीसुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले व त्यांच्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या डोळे विस्फारणारी आहे. पोहोचलो दारू तस्करीमध्ये समाविष्ट आहे किंवा संशयित आहे त्या सार्यांना इन्स्टिट्यूशनल कोरोनटाईन करण्यात आल्यास भविष्यामध्ये कोरोनाचे मोठे "छुपे" आकडे समोर येणार नाहीत आणि दारू तस्करांवर या काळात निर्बंध बसण्यास मदत होऊ शकेल.
चंद्रपुरात 2 मे रोजी कृष्णनगर परिसरात पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला आणि चंद्रपूरकरांना धडकी भरली. आज 22 रूग्ण अशी स्थिती आहे. वेळेनुसार नियमात कडकपणा आला आणि जिल्हावासियांनी तो स्विकारला सुद्धा! चंद्रपुरातील 22 पैकी सगळेच परप्रांतातून किंवा पर जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले काही बाधीत ही आढळले आहेत. या घटनांना ध्यानात घेऊन येणारा धोखा टाळण्यासाठी वरील बाबींकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी अवश्य गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.