▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मजूरांना मदतीचा हात

परराज्‍यातून परतलेल्‍या मजूरांची बल्‍लारपूरात भोजन व्‍यवस्‍था व स्‍वगृही परतण्‍यासाठी वाहन व्‍यवस्‍था

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने परराज्‍यात काम करणारे मजूर आता स्‍वगृही परतु लागले आहे. रेल्‍वेने बल्‍लारपूर शहरात परतलेल्‍या सदर मजूरांना आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मदतीचा हात देण्‍यात आला आहे. भाजपा पदाधिका-यांच्‍या मदतीने या परराज्‍यातून परतलेल्‍या मजूरांना त्‍यांच्‍या स्‍वगृही परतण्‍यासाठी वाहनाची व्‍यवस्‍था बल्‍लारपूर-बामणी टर्निंगवरून करण्‍यात आली. याठिकाणी या मजूरांची भोजन व्‍यवस्‍था, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था सुध्‍दा करण्‍यात आली. त्‍यानंतर सदर मजूरांना त्‍यांच्‍या घरी सोडण्‍यासाठी वाहनांची व्‍यवस्‍था सुध्‍दा करण्‍यात आली आहे.
यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, ट्रान्‍सपोर्ट सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष राजू दारी, भाजपा शहर अध्‍यक्ष काशी सिंह, राजू गुंडेटी, भाजयुमो जिल्‍हा सरचिटणीस आशीष देवतळे, ट्रान्‍सपोर्ट सेलचे तालुकाध्‍यक्ष गुलशन शर्मा, दलित आघाडी महामंत्री विक्‍की दुपारे, श्रीकांत उपाध्‍ये, राजेश कैथवास आदींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मजूरांना मास्‍क चे वितरण करण्‍यात आले. भाजपा पदाधिका-यांनी सुध्‍दा सोशल डिस्‍टंसींग पाळत मजूरांना सहकार्य केले.

कोरोना विषाणूचा वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्‍या लॉकडाऊन दरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी भोजन व्‍यवस्‍था, जीवनावश्‍यक धान्‍याच्‍या किट्सचे वितरण, सॅनिटायझर, मास्‍क, डेटॉल साबणचे वितरण, रूग्‍णांना त्‍यांच्‍या घरी पोहचविण्‍यासाठी स्‍वतंत्र वाहन व्‍यवस्‍था अशा विविध माध्‍यमातुन सेवाकार्य केले आहे. परराज्‍यातून परतलेल्‍या मजूरांना त्‍यांच्‍या स्‍वगृही पोहचविण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या पुढाकारामुळे हे मजूर व त्‍यांचे कुटूंबिय सुखावले आहे.