राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे१लाख तिन हजार रुपयाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत


चंद्रपुर (का.प्र.) :

कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने देशात निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थितीला हातभार म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारा निधी गोळा करण्यात आला आहे. सदर निधी रक्कम 1,03000 रुपये आज (दि.21) ला जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री कोविड सहायता निधीत जमा करण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम सुरु आहे.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, जिल्हाअध्यक्ष नितीन कुकडे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शाम लेडे, सल्लागार रामराव हरडे, सौ. रजनीताई मोरे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी देशभर चालणारी एक चळवळ आहे. विविध सामाजिक उपक्रम महासंघाच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी सातत्याने महासंघाची आंदोलनात्मक कार्यपध्दती सुरु आहे. सभा, निवेदन, मोर्चे, धरणे, आंदोलन, अधिवेशन, ही महासंघाची अस्त्र आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरीता अनेक मागण्या महासंघाने मान्य करुन घेतल्या आहे. कोविड-19 करीता सध्या देश व राज्य पातळीवर जी आपात्कालीन परीस्थिती ओढवली आहे, त्यास हातभार म्हणून महासंघाने सदर निधी गोळा करुन मुख्यमंत्री निधीत सुपूर्द केला आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजु हिवंज, अशोक टिपले, देवराव दिवसे, प्रदिप पावडे, मनोज गौरकर, सौ. अर्चना माशीरकर, सौ. विजयाताई बोढे, सौ. रेखा वंजारी, व आदींच्या सहभागातून निधी गोळा करण्यात आला आहे.
यानंतरही राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, या आपात्कालीन परीस्थितीत सदैव प्रशासनाच्या सोबत राहील, अशी ग्वाही देण्यात आलेली आहे.