राकाॅंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची नाम. जयंत पाटील यांचेशी विविध समस्यावर चर्चा!



चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चुकीच्या कर्ज पुनर्गठन घोळामुळे कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे सोबत ना. जयंत पाटील यांची या विषयावर बैठक झाली, त्यासंदर्भात
आज राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी त्यांच्या समोर मांडला. त्यावर मा.ना.जयंत पाटील यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री व राज्याचे वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक लावून हा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्रातील ' महाआघाडी ' सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना झाला नाही, कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपलं NPA रिझर्व बँकेकडे लपविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी पुनर्गठन/रूपांतर च्या नावाखाली जुनी कर्ज थकबाकी परत आल्याचे दाखवून त्यावरील व्याज कापून पुन्हा ते थकीत कर्ज पुन्हा नवीन कर्ज दिल्याचं दाखवून त्या त्या कास्तकाराच्या नावावर चढविल्यामुळे, महाआघाडी शासनाने जेव्हा कर्जमाफी दिली, त्यावेळी मागील कर्जाची थकबाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावावर दिसत नसल्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा बँकेच्या आदेशाने सचिवांनी केलेल्या या पूर्नगठनास कोणत्याही शेतकऱ्याची संमती घेतलेली नाही हे विशेष आणि आता कर्ज माफीचा लाभ न मिळाल्यामुळे व तेच जुने कर्ज पुन्हा नव्याने खात्यावर असल्यामुळे ऐन हंगामात त्यांना नवीन कर्ज मिळणं कठीण झालं असल्याचा मुद्दा यावेळी वैद्य यांनी उपस्थित केला.
तसेच जिल्ह्यात चना व तुरडाळ शेतकऱ्यांकडे अजूनही पडलेली असल्यामुळे चना व तुरडाळ खरेदी आधारभूत किंमतीने घेणे पुन्हा सुरू करण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती नाम. जयंत पाटील यांनी वैद्य यांना केल्या.
त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठात होवू घातलेल्या नोकरभरतीत OBC वर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे,आणि राज्यात नोकरभरती बंद असतांनाही "गोंडवाना विद्यापीठात" होणारी ही भरती तत्काळ थांबवून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील OBC संघटना व विद्यापीठाचे सिनेट सदस्य यांचे सोबत या नोकर भरतीबाबत चर्चा करून त्यानंतर ही नोकरभरती व्हावी ही मागणी काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये राकाॅंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केली होती.