जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७१हजार नागरिक दाखलचंद्रपूर,दि. 28 मे: जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकुण संख्या 71 हजार 133 आहे.कोविड-19 संक्रमित रुग्णांची संख्या 22 असून 4 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले आहे.तसेच 16 रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. तर 2 रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकुण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने चंद्रपूर शहर व शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्यांसाठी शकुंतला लॉनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.तसेच आतापर्यंत आढळलेले सर्व कोविड रुग्ण,प्रतीबंधित क्षेत्रातील प्रत्येक नागरिक बाहेरून आलेल्या प्रत्येकाने अनिवार्य पणे आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावे.सोबतच स्मार्ट फोन असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन केले आहे.

कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.तसेच,आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात 8 व महानगरपालिका क्षेत्रात 3 असे एकूण 11 कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते.परंतु,बिनबा गेट चंद्रपूर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे एक कंटेनमेंट झोन कमी करण्यात आल्याने सध्या एकुण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे.

जिल्ह्यात सध्या एकूण 10 कंटेनमेंट झोन सुरू असून अती जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 80 व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 51 असे एकूण 131 संपर्कातील व्यक्तींची संख्या असून 85 संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत व त्यापैकी 6 पॉझिटिव्ह7 निगेटिव्ह व 9 प्रतीक्षेत आहेत. उर्वरित 12 व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याने स्वॅब नमुने घेण्यात आलेले नाही व इतर जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहे.

ग्रामीण भागामधील चंद्रपूर 6बल्लारपूर 2पोंभूर्णा 1सिंदेवाही 2मुल 3ब्रह्मपुरी 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच शहरी भागामधील बल्लारपूर 1वरोरा 2 ‌ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.तर चंद्रपूर महानगरपालिका मधील कृष्णनगर 1बिनबा गेट 1बाबुपेठ 1बालाजी वार्ड 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यापैकी कृष्णनगर‌ एक व बिनबा गेट एक असे एकूण दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यांत 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. तपासणीस पाठविलेले स्वॅब नमुने 895 आहे. यापैकी पॉझिटिव्ह 22निगेटिव्ह 801तर प्रतीक्षेत 72 नमुने आहेत.

ग्रामस्तरावर 3 हजार 658 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तालुकास्तरावर 482 नागरीक संस्थात्मक अलगीकरणात आहेत तर जिल्हास्तरीय संस्थात्मक अलगीकरणात 369 नागरिक आहेत असे एकूण जिल्ह्यातील 4 हजार 509 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

आतापर्यंत 59 हजार 721 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तर 11 हजार 402 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.