दिव्यांगाचा निधी खर्च न करणा-या ग्रामसेवक, सरपंचांवार गुन्हा नोंदवा ,प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे

दिव्यांगाचा निधी खर्च न करणा-या ग्रामसेवक, सरपंचांवार गुन्हा नोंदवा
प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे


जिवती तालुका प्रतिनिधी:- संपूर्ण जगावर कोरोना संकट उद्दवल आहे संपूर्ण देश एकजुटीने सामना करत आहेत.पण ज्या ग्रामपंचायतीनी दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखर्चित ठेवला आहे अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी ऑनलाईन तक्रार अर्ज जिवती पंचायत समिती विस्तार अधिकारी, चंद्रपूर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ना.बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत करण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की चालू वर्षातील अपंग कायद्या अंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा ५ टक्के निधी मार्च २०२० अखेर खर्च न करणा-या सर्व ग्रामसेवक व संरपंच यांच्या निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी तसेच अशा निधी खर्च न करणा-या ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा नोंद करण्याचीही करण्यात आली आहे व यांनी आपल्या तक्रार अर्जात येत्या ४ मे पर्यंत निधी जमा न झाल्यास ५ मे प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर च्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिलेल्या आहे...