Gondpipariकारवाई न करताचं अवैध दारू सोडून देणारे गोंडपिपरीतील ते "के-के-के!"


 
गोंडपिपरी :
संचारबंदी नंतर कोरोनाच्या पार्श्र्वभूमी पोलिसांचे कार्य प्रशंसनिय राहिले आहे. काही मात्र याला अपवाद ठरले आहेत. नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील वनी बॉर्डरवर गोरे नामक चंद्रपुरच्या शिपायाला दारू आणताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला निलंबितही करण्यात आले. यामुळेच चंद्रपूर जिल्हा पोलिसाची मोठी बदनामी झाली. तिचे प्रकरण सध्या गोंडपिंपरीत चर्चिले जात आहे.
रविवार दि.१० मे रोजी तेलंगणा राज्यातून एका चारचाकी वाहनात दारू येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गोंडपिपरी च्या पोलिसांना कळली. सापळा ही रचला गेला. तस्करांचे चार चाकी वाहन थांबविण्यात ही आले. त्यात दारू असल्याचे निष्पन्नही झाले व नंतर कट आखला गेला आणि पकडलेली ती दारू सरसकट वाहनासोबत सोडून देण्यात आली. परंतु चोर मार्ग व गैरकृत्य हे कधीही लपत नसते, तसेच या भामट्या पोलिसांचे झाले. नावामध्येचं "के-के-के" असलेले हे तीनही भाग पोलीस आताच गोंडपिपरी मध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक चर्चांना गोंडपिपरी मध्ये यामुळे पेव फुटले असून या के-के-के नी "शेण" किती खाल्ले ? याची खमंग चर्चा गल्ली-बोळात रंगु लागलेल्या आहेत. त्यामुळे या शिपायांचे चांगलेच दणाणले असून काही दिवसांपूर्वी घडलेल्या सुपारी प्रकरण अजून चर्चेमध्ये येत आहे.