चंद्रपूरातील 2 कार्यालय वगळता 14 उपनिबंधक कार्यालये सुरू

चंद्रपूरातील 2 कार्यालय वगळता

14 उपनिबंधक कार्यालये सुरू


चंद्रपूर, दि. 4 मे : चंद्रपूर शहरांमध्ये असणारे सह दुय्यम निबंधक वर्ग 2 चंद्रपुर व चंद्रपूर -2 ही 2 कार्यालय वगळता जिल्ह्यातील 14 ही तालुक्यातील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयातील स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारास 4 मे रोजी पासून सुरुवात झाली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर फक्त चंद्रपूर येथील 2 कार्यालय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे व्यवहार मात्र सुरू झाले आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज साधारण दि.20 मार्च 2020 पासून बंद करण्यात आले व दि.25 मार्च 2020 पासून देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेमुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह अधिकारी कार्यालये देखील दस्त नोंदणी संबंधात बंद आहेत.

वित्त विभागमंत्रालयमुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2020/प्र.क्र.19(1)/ साधनसंपत्तीदि.13 एप्रिल अन्वये कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना अनुषंगाने आवश्यक उपाययोजनाबाबत

उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि. 14 एप्रिल 2020 च्या संदर्भ-1 मधील उक्त बैठकीच्या इतिवृत्तातील "स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री पूर्ववत सुरु करुन ऑनलाईन नोंदणी व्यवहार करण्याबाबत" विषय क्र.1 चे अनुषंगाने स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार पूर्ववत सुरु करुन मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदणी पूर्ववत सुरु करण्यात यावी असे निर्देशित करण्यात आलेले आहे.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकमहाराष्ट्र राज्य,पुणे यांचे  कार्यालयीन परिपत्रक मध्ये सद्यस्थितीत लॉकडाऊन सुरु असूनपुढे ज्या ज्या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे शासनाकडून/जिल्हाधिकारी यांचेकडून (किंवा संबंधित स्थानिक सक्षम प्राधिकरणाकडून) जाहिर केले जाईल व त्यानंतर कार्यालये कार्यान्वीत करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक मान्यता देतील.

तेव्हा त्या त्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालयेमुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह अधिकारी कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करणे आवश्यक असल्याचे निर्देशित केलेले आहे.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकमहाराष्ट्र राज्य,पुणे यांचे  कार्यालयीन परिपत्रकात  नमूद केल्याप्रमाणे व केंद्र शासनराज्य शासनस्थानिक स्वराज्य संस्था इ. यांचेकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना/घ्यावयाच्या दक्षतेबाबत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना/निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे अटीचे अधिन राहून सह जिल्हा निबंधक वर्ग-1 (नि.श्रे.) तथा मुद्रांक जिल्हाधिकारीचंद्रपूर कार्यालय अधिनस्त येणारे ता.चंद्रपूर येथील सद्यःस्थितीत सह दुय्यम निबंधक वर्ग-चंद्रपूर व चंद्रपूर-ची कायालये वगळता इतर 14 तालुक्यातील दुय्यम निबंधक श्रेणी-भद्रावतीवरोराचिमूरनागमिडब्रम्हपुरीसिंदेवाही,मूलसावलीपोंभुर्णागोंडपिपरीबल्लारपूर,वव राजुराकोरपनाजिवती या कार्यालयात स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी दि. मे  पासून पूर्ववत सुरु करणे कामी मान्यता देण्यात येत आहे.