लाॅक डाऊन संपण्यापूर्वीच चंद्रपुरात आली "विदेशी दारू" ची पहिली खेप !(चंद्रपूर विशेष)
आज गुरुवार दिनांक 28 मे रोजी चंद्रपूर शहरात विदेशी दारूची पहिली खेप अवतरली. 27 मे पासून नागपूर शहरातील बार ला परवानगी देण्यात आली होती. यापूर्वी नागपूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर ग्रामीण व शहरांमध्ये दारू विक्रीला पूर्णता विरोध केल्यामुळे कालपावेतो नागपूर मध्ये दारू सुरूचं झाली नव्हती. कालपासून नागपूर शहरात दारू सुरू झाल्यानंतर आज चंद्रपुरात विदेशी दारूची पहिली खेप आल्याचे चित्र आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूच्या दुकानांना (बार नव्हे!) परवानगी देण्यात आली होती या ठिकाणी होणारी मद्य शौकीनांची तोबा गर्दी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरली होती. आज मात्र चंद्रपूर शहरांमध्ये महाराष्ट्राची विदेशी दारू अवतरल्यामुळे मद्य शौकिनांचे "वारे-न्यारे" होतांना बघायला मिळाले. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाॅक डाऊनची चौथी स्टेप 31 मे पर्यंत आहे. तोपावेतो जिल्ह्यांमध्येही कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून जिल्हाअंतर्गत प्रवास विना परवानगीने सुरू असून जिल्ह्याबाहेरून येताना परवानगीची गरज असल्याचा नियम आजही लागु आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये institutional कोरोनटाईन करण्याचे सक्तीचे आदेश आहेत आहेत, मग नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातून दारूचा पुरवठा करणारे व विक्री करणाऱ्यांवर संचारबंदीच्या नियमाप्रमाणे सुद्धा कठोर कारवाई करण्यात यायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सायंकाळी सात ते पहाटे सात पर्यंत प्रवासावर नियमाप्रमाणे बंदी आहे. मग आज हा दारूसाठा चंद्रपूर शहरामध्ये कसा काय पोहोचला हा संशोधनाचा विषय आहे. आतापावेतो दारू तस्करीमध्ये सक्रिय असलेले मोठे व्यापारी यांनी दारु तस्करीसाठी नवीन शक्कल लढविल्याची चर्चा सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी संचारबंदी दरम्यान दहाच्या जवळपास बार मालकांचे परवाने नेहमीसाठी रद्द केले आहेत. चंद्रपुरात विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या बार मालकांची कसून तपासणी करून त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी व कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा. मागील पंधरा दिवसापासून चंद्रपूरची जनता lockdown चे पालन करीत आहे. 31 मे नंतर काय होते ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून दारू तस्करांनी त्याची पर्वा न करता व साथरोगाच्या देशव्यापी संकटाला न जुमानता सुरु केलेला हा व्यवसाय देशविघातक असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची ची गरज आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी व जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्यातील दारू तस्करी वर व विक्रीवर कडक नजर ठेवून निर्बंध आणायला हवा, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

तस्करांच्या महिलांना समोर करून चंद्रपुरात दारू तस्करीला करण्यात आलेली सुरुवात येणाऱ्या काळात धोकादायक सिद्ध होऊ शकते. यासंदर्भात मागील दोन दिवसापासून दारू तस्करीत असलेल्या काही तस्करांनी सभा घेतल्या होत्या, योजना बनविल्या होत्या त्यानंतरच आज चंद्रपुरात विदेशी दारूचा पुरवठा झाल्याची ची बोलकी प्रतिक्रिया एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी पोलीस विभागचं बदनाम होतो परंतु यामागे काही वेगळे काळे-बेरे आहे, त्यावर आत्ताचं लक्ष देणे गरजेचे असल्याचे या अधिकाऱ्यांनी यावेळी खाजगीमध्ये बोलतांना शआवर्जून सांगितले.