आ. मुनगंटीवार यांच्‍या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात जिल्‍हयात अभूतपूर्व विकासकामे – महापौर राखी कंचर्लावार




सदैव जनसेवेचा ध्‍यास उराशी बाळगुन त्‍यांच्‍या कल्‍याणाचा विचार करणारे आ. मुनगंटीवार हे या जिल्‍हयाचे भूषण आहे. त्‍यांच्‍या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात या चंद्रपूर जिल्‍हयाने अभूतपूर्व असा विकास अनुभवला. त्‍यांच्‍या पुढाकाराने महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाच्‍या विशेष निधीतुन 19 लक्ष 68 हजार रू. इतका निधी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला रूग्‍णवाहीका व शववाहीका खरेदीसाठी मंजूर करण्‍यात आला. त्‍या माध्‍यमातुन आम्‍ही खरेदी केलेल्‍या बॅटरी ऑपरेटेड शववाहीका व रूग्‍णवाहीका आज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला सुपुर्द करताना लोकप्रतिनिधी म्‍हणून आगळे समाधान लाभले आहे. रूग्‍णसेवा हीच खरी ईश्‍वर सेवा असे आ. मुनगंटीवार नेहमी म्‍हणतात. त्‍याचा प्रत्‍यय आज आल्‍याची भावना चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी व्‍यक्‍त केली.

दिनांक 18 मे रोजी महापौर सौ. राखी कंचर्लावार व उपमहापौर राहूल पावडे यांनी बॅटरी ऑपरेटेड रूग्‍णवाहीका व शववाहीका ची चावी अधिष्‍ठाता डॉ. एस.एस. मोरे यांना सुपुर्द केल्‍या. महापौरांनी यावेळी दोन्‍ही वाहनांचे पूजन केले. महापौर व उपमहापौर यांनी ही वाहने चालवून सुध्‍दा बघितली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात वनविकास महामंडळाच्‍या विशेष निधीतुन 19 लक्ष 68 हजार रू. इतका निधी रूग्‍णवाहीका व शववाहीका खरेदीसाठी मंजूर करण्‍यात आला होता. त्‍या माध्‍यमातुन सदर रूग्‍णवाहीका व शववाहीका खरेदी करण्‍यात आल्‍या आहेत. यावेळी स्‍ट्रेचर बाहेर काढणे व पुन्‍हा वाहनात ठेवणे याचे प्रात्‍यक्षीक कंपनीच्‍या अभियंत्‍यांनी करून दाखविले. या शववाहीका व रूग्‍णवाहीकेचा वापर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी करण्‍यात येणार आहे. पर्यावरणपूरक असणारी ही वाहने एकदा सहा तास चार्ज केली की 80 कि.मी. चा प्रवास करू शकते. पर्वलन्‍स ग्रीन सोल्‍युशन बंगलूर या ठिकाणी ही वाहने तयार करण्‍यात आली असून 5 व्‍यक्‍ती, 1 चालक, 1 रूग्‍ण याप्रमाणे एकूण 7 लोकांसाठी यात व्‍यवस्‍था आहे.
सदर रूग्‍णवाहीका व शववाहीका लोकार्पण करताना महानगरपालिका आयुक्‍त राजेश मोहिते, मनपा सदस्‍य संदीप आवारी, संजय कंचर्लावार, रवी आसवानी, राहूल घोटेकर, राजेंद्र अडपेवार, सुभाष कासनगोट्टूवार, देवानंद वाढई, अंकुश सावसाकडे, प्रकाश धारणे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, सौ. शिला चव्‍हाण, सौ. वंदना तिखे, सौ. शितल गुरनुले, सौ. छबू वैरागडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.