कोण करेल कारवाई याकडे सर्वांचे लक्ष
(चंद्रपूर प्रतिनिधी)., वेकोलीतून ३१मार्च ला निघालेले कोळस्याचे ट्रक अजुनही नागपुर रोडवर बेवारस! हजारो टन कोळसा सबसिडीचा असून मे.कोठीयावाड कोल आणि गूजरात कोल अॅड कोक यांचे नावे डिओ असताना तो कोळसा कुठे साठवली जात आहे हे मात्र कोड आहे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा चोरीचे प्रकरण कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्यापासून सुरू झाले असले तरी ऑनलाईन कोळसा खरेदीच्या नावाखाली पडोली, नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टालवर कोळसा खाली करणाऱ्या अनेक कोळसा माफियांची यादी आता हाती लागली असून आता मे. काठीयावाड कोल आणि गुजरात कोल ॲन्ड कोक चा सबसिडी चा कोळसा सुद्धा नागाडा, पडोली च्या कोळसा टालवर खाली होत असल्याचे दिसत आहे.
(चंद्रपूर प्रतिनिधी)., वेकोलीतून ३१मार्च ला निघालेले कोळस्याचे ट्रक अजुनही नागपुर रोडवर बेवारस! हजारो टन कोळसा सबसिडीचा असून मे.कोठीयावाड कोल आणि गूजरात कोल अॅड कोक यांचे नावे डिओ असताना तो कोळसा कुठे साठवली जात आहे हे मात्र कोड आहे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा चोरीचे प्रकरण कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्यापासून सुरू झाले असले तरी ऑनलाईन कोळसा खरेदीच्या नावाखाली पडोली, नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टालवर कोळसा खाली करणाऱ्या अनेक कोळसा माफियांची यादी आता हाती लागली असून आता मे. काठीयावाड कोल आणि गुजरात कोल ॲन्ड कोक चा सबसिडी चा कोळसा सुद्धा नागाडा, पडोली च्या कोळसा टालवर खाली होत असल्याचे दिसत आहे.
मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 ला सकाळी१०.३०च्या दरम्यान दुर्गापूर रय्यतवारी काॅलरी मध्यून४ट्रक कोळसा भरून बाहेर निघाले.त्याचा डिओ मे.काठीयावाड कोल आणि गूजरात कोल अॅड कोक या नावे असतांना हजारो टन कोळसा पडोली च्या कोळसा चोरांच्या टालावर पोचलाच कसा हे अजूनही कोडंच आहे. मात्र आता त्या कोळसा टालवर पत्रकार आणि काही राजकिय कार्यकर्त्यांनी पहारा दिल्याने व कोळसा भरलेल्या गाड्यांचा पाठलाग सुरू झाला असल्याने जवळपास कोळशाच्या पाच ते आठ ट्रक गाड्या रस्त्यातच उभ्या असून पडोली परीसरात तीन गाड्या अजूनही खाली होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या गाड्या मागील ३१ मार्चला सकाळी १०.३० वा.च्या दरम्यान डीआरसी आणि महाकाली कॉलरीतून निघाल्या होत्या त्या अजूनही खाली न झाल्याने त्या नेमक्या जाणार कुठे ? गुजरात की कोळसा टालवर? याबाबत अजूनही शंका आहे. मात्र काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रे व न्युज पोर्टलनी वृत्त प्रकाशित केले होते.त्या वृत्ताचा आधार घेत काही राजकिय खंडणी बहादुर भामटय़ांनी संधी साधून कोळसा टाल मालकांकडून लाखोंची रक्कम धमकी देवून वसूली केल्याची चर्चा आहे.चोरीच्या कोळशाच्या या खेळात कोळसा माफियांनी किती पत्रकार व राजकिय कार्यकर्त्यांना आपले हात साफ करण्याची संधी दिली त्याची माहिती पण आता जाहीर होण्याच्या मार्गावर असून पडोली परीसरात कोळसा भरून असलेले ट्रक खाली न होण्यामागे काय गुपित काय ? हे लवकरच समोर येणार आहे.
कोळशाच्या बातम्यांकडे कोरोना लॉकडाऊनमुळे प्रशासनाची डोळेझाक !
सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा हा कोळसा माफियांच्या माध्यमांतून नागाडा व पडोली येथील टालवर उतरवून नंतर तो मोठ्या किमतीत चोर बाजारात विकला जातो, या संबंधात वारंवार वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणीतून हा चोरीचा प्रकार कागदोपत्री घड्या नीट बसवून करण्यात आला आहे. आज देशावर कोरोना या महाभयंकर बिमारीचे संकट कोसळले आहे. या संकटाला मात देण्यासाठी देशातील साधारण व्यक्ती पासून तर मोठ्या उद्योगपतींनी पंतप्रधान मोदी व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हाकेला हो देत मदतीची साथ दिली आहे. मात्र एकीकडे देश संकटातून उभरण्याच्या प्रयत्नात असतांना कोळसा चोर मात्र सबसिडीच्या कोळसा चोरीतून सरकारलाच नाही तर सर्वसामान्यांना ही लुटण्यात अग्रेसर राहिले आहे. एकीकडे कोरोनाचे युद्ध तर दुसरीकडे पडोली च्या टालावर कोळसा तस्करांची लुटालुट सुरू आहे. चोरीच्या या नाट्ट्याचे हे काही भाग आहेत आणखीन पूर्ण नाट्य पुन्हा कधी सुरू होईल आणि कोळसा तस्करांवर कायद्याचा बडगा वेकोली प्रशासन कधी व कसा उगारेल हे पाहणे आता बाकी आहे. कोळसा चोरीच्या या नाटकाचे किती भाग अजून अधिकाऱ्यांच्या सहभागाने चालतात हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.
काळोख्या रात्री चालणारा कोळसा तस्करांच्या सबसिडीचा कोळसा पडोली च्या टालावर रातोरात पोहोचविण्याचा खेळ 31 तारखेपर्यंत सुरळीत सुरू होता. खुलेआम कायद्याची पायमल्ली होत होती.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र स्टेटस मायनिंग कार्पोरेशनच्या सबसिडी अंतर्गत कैलास अग्रवाल यांच्या 26 गाड्या कोळसा चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर वेकोली प्रशासनाने मायनिंग कार्पोरेशनचे करार रद्द केले परंतु कैलास अग्रवाल याला न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात यश मिळाल्यामूळे कोळसा तस्करांच्या हिंमतीत वाढ झाली आहे. नागाडा कोळसा टालावरील चोरी प्रकरणाची शाई ओली असतानाच गुजरात येथील अहमदाबाद काठीयावड कोल व गुजरात कोल च्या माध्यमातुन सबसिडीच्या कोळसा खुलेआम पडोली च्या टालावर मोठ्या प्रमाणात उतरवण्यात आला. वेकोली प्रशासनाच्या नियमाला धाब्यावर बसवून कोळसा तस्कर सरकारी संपत्तीची खुलेआम चोरी करून करोडो रूपयाची अफरातफर करीत आहे.