▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

पालकमंत्री ना.वडेट्टीवारकडून ब्रम्हपरीतून मोफत अन्नधान्य वाटपाचे शुभारंभ

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवारांकडून

मोफत अन्नधान्य वाटपाला ब्रम्हपुरीत शुभारंभ

40 हजार कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू


चंद्रपूर,दि.4 एप्रिल : लॉकडाऊन व संचारबंधीत रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक विवंचनेत असणाऱ्या जिल्ह्यातील 40 हजार कुटूंबाना मदतीचा हात मिळाला आहे. त्यांना 15 दिवस लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते दिनांक 4 एप्रिलला ब्रम्हपुरी येथे करण्यात आले.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपाला आजपासून ब्रम्हपुरी तालुक्यातून सुरुवात केली असून सावली व सिंदेवाही तालुक्यात 5 एप्रिलला तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 6 एप्रिलपासून टप्पाटप्प्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

शेतमजूर व गरजवंताना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपावेळी नगराध्यक्षा नगरपरिषद रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलींद शिंदे, तहसीलदार विजय पवार, मुख्याधिकारी नगरपरिषद वासकर तसेच खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत उपस्थित होते. यावेळी बंडू श्याम वाघाडे, मुक्ता महादेव वैरकर, गोविंदा बाबुराव मडावी, प्रिया प्रमोद राऊत, यमुना गोविंदा राऊत यांच्यासह 50 गरजवंतांना अन्न धान्य व जीवनावश्यक किट देऊन शुभारंभ करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी व देशाच्या चांगल्या आरोग्यसाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज होती. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. संपूर्ण लॉकडाउन म्हटल्यावर सर्वच थांबलं. वाहतूक थाबली,कामधंदे थांबले, मग ज्याचे हातावर आणून पोट भरते त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार या विचारातून अशा परिस्थिती त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या स्वखर्चातून व त्यांच्या मार्फत ब्रम्हपुरी तालुक्यातील गरजवंतांना  आज मोफत 10 किलो तांदूळ2 किलो तूर डाळ1 किलो खाद्य तेल200 ग्राम मिरची पावडर50ग्राम हळद पावडर1 किलो मीठसाबण या जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम 144 चे पालन करण्यात आले ब्रम्हपुरी तालुक्यानंतर 5 एप्रिलला सिंदेवाही व सावली तालुक्यात6 एप्रिपासून चंद्रपूरबल्लारपूर   तालुक्यातील  सर्व गरीब व गरजूना मोफत जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात येणार आहे. 10 किलो तांदूळ2 किलो तूर डाळ1 किलो खाद्य तेल200 ग्राम मिरची पावडर50 ग्राम हळद पावडर1 किलो मीठसाबण या जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात येणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाहीलहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नयेत्यांना पोटभर अन्न पलब्ध व्हावे म्हणून तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांसाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी शासकीय योजनव्यतिरिक्त जाऊन स्वखर्चातून जिल्ह्यातील 40हजार कुटूंबाना अत्यावश्यक किराणा  वस्तू पॉकेट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

शासनाकडून जे साहित्य मिळणार आहे ते साहित्य मिळेलच. त्या व्यतिरिक्त पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे साहीत्य मोफत मिळणार आहेत. समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे या उक्तीनुसार पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे नेहमीच कार्य करीत असून गरजूगरीबशेतकरीशेतमजूर या लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात असा त्यांची जनतेमध्ये ओळख आहे.