चंद्रपूरात परराज्यातून व जवळील जिल्हयातून आळ मार्गाने येणाऱ्यावर खडक प्रतिबंधाची गरज
चंद्रपुर : जगभरात कोरोनाने कहर केले असतांनाच देश्यातही कहर माजवला आहे .त्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अंत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्रातील 11 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहे. तेलंगणा राज्य व दोन अंतर्गत जिल्ह्यातील सीमांच्या लगत असलेला हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे परंतु या जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यातून व प्रांतातून चोर मार्गाने येणाऱ्यांची संख्या lock down चा अवधी वाढल्यानंतर दिवसेंदिवस वाढत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.
मिळालेल्या विश्वसनिय सुत्रांनुसार नुकतेच गुरूवार 16 एप्रिल रोजी तेलंगाना प्रांतातून काही मजुरांनी चंद्रपुरच्या बॉर्डरवर चोर मार्गाने एन्ट्री केली. सतरा-अठरा च्या संख्येने असलेले हे लोक लपत-छपत पहाडावरील जिवतीपर्यंत आले. जिवती तालुक्यातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांना खाजगी वाहनांमध्ये गडचांदूर च्या एका प्रसिद्ध चौकापर्यंत लपून सोडण्यात येवून स्वत:ची जबाबदारी झटकण्यात आली. तेलंगाना मधून आलेला हा जत्था गडचांदूर येथील काही समाजसेवकांना दिसल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली व ही झड आपल्या गावी नको म्हणून खाजगी वाहनाने त्यांना राजुरा येथे हलविण्यात आले. याची सूचना राजूराच्या शासकीय विभागाला देण्यात आली होती अशी माहिती आहे. खरे तर या तेलंगाणातून आलेल्या जत्थ्याला क्वारंटाईन करणे आवश्यक होते. परंतु तसे न होता प्रत्येकाने आपली जबाबदारी झटकत ती दुसऱ्यांवर ढकलली. मिळालेल्या माहितीनुसार राजुरा मध्ये गेलेला तेलंगणातील तो जत्था कुठेच क्वारंटाईन झाला नाही, तो समोर कुठे गेला याचा काही पत्ता नाही. सामाजिक भान, प्रशासकीय यंत्रणांची प्रशासकीय तालमेल नसल्यामुळे असे प्रकार जिल्ह्यात घडताना दिसत आहे. अनेक शासकीय अधिकारी सुद्धा कोणतीही पुर्वसुचना न देता रेड झोन मधून जिल्ह्यात येत आहेत. नुकतेच जिल्ह्यातील एक मोठा अधिकारी नागपुरमधून चंद्रपुरात आला. त्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळता क्षणी चंद्रपूरातून त्याने पळवाट काढण्याची सांगण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या अनेकांना जागरूक नागरिकांकडून सूचना मिळाल्यानंतर होम -क्वारंटाईन व क्वारंटाईन करण्यात आले आहेत. परंतु ज्यांच्या सूचना मिळाली नाही त्यांचे काय? ग्रीन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला आता मात्र सांभाळून ठेवावे लागणार आहे आणि ही जबाबदारी सर्व शासकीय यंत्रणा सोबत सर्वांनाच पार पाडायची आहे. यासाठी शासकीय यंत्रणांनी सर्वसामान्य सोबत तालमेल करून या धोक्याला भविष्यात टाळायचे आहे. विश्वसनीय सूत्रानुसार तेलगांना प्रांताने यापूर्वी तेलंगणात असलेल्या बाहेरील लोकांना अन्नधान्य व इतर सुविधा पुरविण्याचे मीडियासमोर आश्वासन दिले होते. परंतु लॉक डाऊन वाढल्यानंतर ह्या जबाबदारीपासून तेलंगाना सरकार स्वतःला दूर ठेवत असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. बाहेरील लोकांना शासकीय गाड्यांमध्ये महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सोडून देण्यात येत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हेच नागरिक मग चोर मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार तेलंगणा प्रांतातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दारू सप्लाय होतो तोच मार्ग तेलंगाना पोलिसांकरवी या नागरिकांना दाखविला जात आहे व चंद्रपुर जिल्ह्यात प्रवेश मिळविला जात आहे. ही चंद्रपुर जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. दुसरी धोकादायक बाब म्हणजे अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी वाहतूक सुरू आहे. ट्रक, मेटाटोर, मालवाहू तीन चाकी वाहने यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा दिल्या जात आहेत. मिळणार्या काही पैशाच्या लालसेपोटी या वाहनांचे वाहक (driver) अडकलेल्या-फसलेल्या लोकांना जिल्ह्याच्या सीमांपर्यंत सोडून देण्याचे गैरकृत्य करीत आहेत यावर त्वरित बंधन आणणे ही तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी यासाठी सजग राहणे गरजेचे आहे, बाहेरून येणाऱ्या प्रत्येकांवर नजर ठेवून त्याच्या सूचना प्रशासनाने जाहीर केलेल्या क्रमांकावर द्याव्यात असे आव्हान प्रशासनातर्फे यापूर्वीही करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ते जिल्ह्याच्या सीमा अंतर्गत असलेल्या गावांमध्ये गाव कमिट्या, सजग नागरिकांच्या कमिट्या, वार्ड कमिट्यांची स्थापना करून येणाऱ्या धोक्याला कसे आटोक्यात आणता येईल याचे शिस्तबद्ध नियोजन न केल्यास भविष्यातील धोका टाळता येणार नाही हेही तेवढेच हेही तेवढेच सत्य आहे.
((((((++--------महत्वाचे क्रमांक------------++)))))
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा,अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे