गॅस एजन्सीत ही होत आहे ग्राहकांची लुटमार!

गॅस एजन्सीत ही होत आहे ग्राहकांची लुटमार!

चंद्रपूर प्रतिनिधी;-
अत्यंत जिवनाश्यक असलेले गॅस सिलेंडर साठी आज ग्राहकांना एजंन्सीच्या चकरा माराव्या लागत आहेत. गॅस सिलेंडर उपलब्ध असताना सुद्धा एजन्सीत काम करणारे कर्मचारी सिलेंडर धारकांना पासबुक, आधार कार्ड, आॅनलाईन पैसे जमा करा, सिलेंडर तुम्हीच घेऊन जा अश्या प्रकारचे ग्राहकासोबत वर्तणुक करीत असल्याने ग्राहक आल्या पावली परत जात आहेत. सामान्यतः माणूस आजच्या परिस्थीतीने वैतागला आहे. जिवनावश्यक वस्तुंचा पुरेशा प्रमाणात साठा असून तो ग्राहकांपर्यंत वाजवी दरात पोहोचता व्हावा, असा शासनाचा दंडुक असतांनाही गॅस एजन्सी धारकाकडून ग्राहकांची लुट थांबवून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
    लाॅकडाऊनच्या काळात कुणीही घराच्या बाहेर पडु नये म्हणून संचारबंदी (१४४) लागू करण्यात आली आहे.त्यातच एजन्सीतील कर्मचारी ग्राहकांना आल्यापावली परत पाठविण्यात येत असल्याने ग्राहकांनी अश्या आणिबाणीच्या काळात जावे तर कुठे हा एक प्रश्न आवासून उभे आहे.एकाद्या ग्राहकांकडे जर आॅनलाईन पैसे जमा करण्याची सुविधा नसल्यास त्यांनी करावे काय?
   जगात कोरोनाने थैमान घातले आहे.या कोरोना रूपी अजगराने देश्यालाही विळखा घातला आहे. सामान्य जनता यात होरपळून निघत आहे. अनेक कंपण्या बंद झाल्याने असंघटीत कामगारांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे.महीण्याभरापासून लाॅकडाऊनमध्ये असल्याने पोटाची खळगी भरणेही कठीण झाले आहे.अश्या परीस्थितीत किराणा दुकानदार ही वस्तुचे कींमत दाम दुप्पट केले आहे. हि छळ त्वरित थांबविण्यात यावा अशी मागणी होत आहे.